Home » Uncategorized » * माजलगांवात कापसाच्या गंजीला आग *

* माजलगांवात कापसाच्या गंजीला आग *

* कापसाच्या गंजीला आग *

– ७० लाखाचे नुकसान
– टेम्पोसह,तीन गंजी जळून खाक.

माजलगाव / रविकांत उघडे

तालुक्यातील फुले पिंपळगाव शिवारात असलेल्या मनकोट जिनिंग मधील कापसाच्या गंजिला सकाळी 9 वाजता आग लागली .या आगीत कापसाच्या तीन गंजी सह एक टेम्पो जळून खाक झाला. आज मनकॉट जिनिंग मध्ये दैनंदिनी प्रमाणे सकाळी खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरू होती.कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस टेम्पो मध्ये आणला होता. सकाळी कापसाला भाव देण्यात ग्रेडर मग्न होते. अचानक आगिने पेट घेतल्यानी सर्वत्र आगीचे लोळ व धुरीचे लोळगे दिसत होते.(आगीचे कारण अस्पष्ट )बघता बघता आगीने रुद्र रूप धारण केले. जिनिंग मध्ये काम करीत असलेल्या कर्मचारी व कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केले. काही वेळेत माजलगाव नगर पालिका अग्निशमन दलाची गाडी हजर झाली. आग विझविण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच बरोबर तेलगाव साखर कारखाना, वडवणी, मानवत, गेवराई, हुन गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचा साठी आल्या होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी 4 तास लागले.या आगीत 60 ते 70 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मालक रामेश्वर टवाणी यांनी दिली. रामेश्वर टवाणी यांनी अधिक माहिती सांगितली की, 11 हजार क्विंटल कापूस उपलब्ध होता. त्यापैकी 5 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. नुकसानीत mh 7407 हा टेम्पो जागेवरच जळून खाक झाला.या आगीत एकंदरीत लाखोंचे नुकसान झाले. ही वार्ता शहरात समजताच हितचिंतकानी हळहळ व्यक्त करून विचारपूस केली. या अगोदर देखील जिनिंग मध्ये, मार्च या आर्थिक वर्षातच, अशा घटना या ठिकाणी घडल्या आहेत. नेमकी, आग लावली की लागली.अशी चर्चा सध्या ऐकावयाला मिळत आहे.या घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच बरोबर घटनास्थळी कृ ऊ बा स सभापती अशोकराव डक यांनी भेट दिली. तसेच व्यापारी महासंघाचे ता अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांनी भेट देऊन विचारपूस केली. मनकॉट जिनिंग मालक रामेश्वर टवाणी यांची मागणी.तालुक्यातील कार्यरत असलेल्या जिनिंग चालकांनी मागणी केली की, कृ ऊ बा स समितीने स्वता:ची अग्निशमन दलाची गाडी घ्यावी जेणेकरून घटनास्थळी वेळेत पहोचल व होणारे नुकसान टळेल

Leave a Reply

Your email address will not be published.