Home » Uncategorized » *मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने स्व.चोपडेंना भावपूर्ण श्रध्दांजली*

*मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने स्व.चोपडेंना भावपूर्ण श्रध्दांजली*

*मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने स्व.चोपडेंना भावपूर्ण श्रध्दांजली*

 

संपादक, पत्रकारांनी दिला स्व.चोपडे यांच्या आठवणींना उजाळा

 

—-

 

बीड/ प्रतिनिधी

 

मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस तथा जेष्ठ पत्रकार स्व. भास्कर चोपडे यांना बुधवारी दि. 21 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संपादक, पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भविष्यात पत्रकारांना येणार्‍या आडचणी दूर करण्यासाठी जिल्हा जिल्हास्तरावर पत्रकार आरोग्य कल्याण निधी उभारावा अशा भावाना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

 

मागील काही वर्षांपासून स्व. भास्कर चोपडे यांनी पत्रकरितामधून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. पत्रकारितेमधील त्यांच्या उल्लेखनिय कार्यामुळे त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बीडच्या पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटविणार्या या जेष्ठ पत्रकारांचे नुकतेच दुःखत निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने बुधवारी दि.21 मार्च रोजी दुपारी एक वाजता येथील शासकिय विश्रामगृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. संपादक, पत्रकार यांनी स्व. चोपडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. भविष्यात पत्रकारांना येणार्‍या आडचणी दूर करण्यासाठी पत्रकार आरोग्य कल्याण निधी उभारण्याची संकल्प देखील व्यक्त करण्यात आली. या शोकसभेस संपादक राजेंद्र आगवान, सर्वत्तम गावरस्कर, सुनिल क्षीरसागर, दिलीप खिस्ती, राजेंद्र होळकर, अभिमन्यू घरत, नागनाथ अप्पा, सतिश बियाणी, जगदीश पिंगळे, परिषदेचे राज्य सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, विशाल सांळूके, विलास डोळसे, उत्तम हजारे, दत्तत्रीय आंबेकर, शेखर कुमार, आशोक खाडे, रवि उबाळे, प्रदिप मुळे, अविनाश वाघीरकर, संजय तिपाले, व्यंकटेश वैष्णव, लक्ष्मीकांत रूईकर, महेश वाघमारे, अनिल वाघमारे ,प्रशांत सुलाखे, सुदाम चव्हाण, सुमूर्ती वाघिरे, लक्ष्मण नरनाळे, वैभव स्वामी, नागनाथ जाधव, महेश जोशी, शिरिष शिंदे, भागवत तावरे, सुधाकर सोनवणे, मुकेश झणझणे, अविनाश कदम, अरभूणे, बूरांडे, काळे, राजेश राजपूत, कृष्णा शिंदे, दिनेश गुळवे, अप्पा महानोर, दत्ता नरनाळे, भागवत वैध, निलकंठ सावरगेकर, प्रा. प्रदिप रोडे, स्वप्निल गलधर, किशोर पिंगळे, डोरले, रमाकांत गायकवाड, दत्ता आजबे, श्रीराम जाधव, अक्षय कांकरिया, अनिल आष्ठपुत्रे, मंगेश निटूरकर, प्रमोद कुलकर्णी, सुशिल देशमुख, प्रा. लक्ष्मण गुंजाळ, गायसमुद्रे, डॉ. श्यामसुंदर रत्नपारखे, शैलेश गलांडे, अमित सासवणे, विकास माने, संजय गुंडे, मधुकर तौर, कमलाकर कुलथे, अनिल भंडारी, उदय जोशी, पोपट कोल्हे, महेश बेदरे यांच्यासह संपादक, पत्रकार व स्व. चोपडे यांचे स्नेही यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी स्व. भास्कर चोपडे यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.