Home » Uncategorized » *मत्स्येंद्रनाथ संस्थानच्या नारळी सप्ताहाला आज होणार प्रारंभ*

*मत्स्येंद्रनाथ संस्थानच्या नारळी सप्ताहाला आज होणार प्रारंभ*

*मत्स्येंद्रनाथ संस्थानच्या नारळी सप्ताहाला आज होणार प्रारंभ*

———

*हेलीकाॅप्टरने पुष्पवृष्टी , माळेवाडी सज्ज*

—–

प्रतिनिधी : बीड

 

शिरूर तालुक्यातील निमगाव येथील श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ संस्थानच्या ४० व्या नारळी सप्ताहाला बुधावारी माळेवाडी ( ता.शिरूर) येथे प्रारंभ होत आहे. महंत स्वामी निगमानंद महाराज यांच्या हस्ते हेलिकाॅप्टरने  पुष्पवृष्टी करण्यात येणार असून भाविकांच्या स्वागतासाठी माळेवाडी सज्ज झाली आहे.

शिरूर तालुक्यातील मत्स्येंद्रनाथ संस्थान राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गडाला ४० वर्षांची नारळी सप्ताहाची परंपरा आहे. यंदाचा सप्ताह माळेवाडी येथे २१ ते २८ मार्च दरम्यान माळेवाडी येथे पार पडत आहे. कीर्तन, प्रवचन, रामकथा, भजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन माळेवाडीकर ग्रामस्थांनी केले आहे. महंत स्वामी निगमानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व जनार्दन महाराज यांच्या उपस्थितीत सप्ताह होणार आहे. बुधवारी महंत निगमानंद महाराज यांच्या हस्ते  हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी करणार अाहेत. सप्ताहाची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली असून नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

——-

Leave a Reply

Your email address will not be published.