Home » Uncategorized » *निराधारांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष-दिलीप भोसले*

*निराधारांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष-दिलीप भोसले*

*तहसील कार्यालयासमोर निराधारांचे जोरदार आंदोलन*
——————-
*निराधारांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष-दिलीप भोसले*
——————-
बीड (प्रतिनिधी) गेल्या वर्षाभरापासून रखडलेले अनुदान मिळत नसल्यामुळे संतप्त निराधारांनी 19 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष दिलीप भोसले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी निराधारांनी सरकारविरोधात घोषणा देऊन आपला संताप व्यक्त केला.
राज्य शासन गेल्या वर्षभरापासून निराधारांचे अनुदान कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडून ठेवत आहे. वयोमानानुसार ज्या निराधारांचे आंगठे उमटत नाहीत त्यांचेही अनुदान खात्यात जमा करण्यात येत नाही. अशा प्रकारे शासनाकडून निराधारांची चेष्ठा करण्यात येत आहे. अनुदानासाठी निराधारांना अनेक वेळा तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात. वेळोवेळी निवेदने देऊन सुध्दा त्याची दखल घेतली जात नाही. अधिकार्‍यांकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. यामुळे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली निराधारांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक लाकाळ साहेब यांच्या मध्यस्तीने तहसीलदार शिंगटे साहेब यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. निराधारांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल तसेच अंगठे उमटत नाहीत अशा 1397 लाभार्थ्यांनी बँक खाते चालू स्थितीत ठेवावे जेणेकरुन त्यांचे पुढील अनुदान खात्यात जमा होईल. ज्यांचे अनुदान आले नाही अशांचेही नाव यादीत घेण्यात येईल, आगामी काळात सर्व अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे आश्वासन तहसीलदार शिंगटे साहेब यांनी निराधारांना दिले. या आश्वासनानंतर निराधारांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान सरकारने आणि प्रशासनाने निराधारांच्या मागणीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले तर तहसीलचे काम बंद करुन  कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिलीप भोसले यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.