Home » ब्रेकिंग न्यूज » अहमदनगरमध्ये कुरिअर कार्यालयात स्फोट, २ जखमी

अहमदनगरमध्ये कुरिअर कार्यालयात स्फोट, २ जखमी

  • घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण

अहमदनगर

अहमदनगरमध्ये कुरिअर कंपनीच्या कार्यालयात स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असून घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.

अहमदनगरमधील माळीवाडा परिसरात एका कुरिअर कंपनीचे कार्यालय असून या कार्यालयात रात्री दहाच्या सुमारास स्फोट झाला. ‘मारुती कुरिअर’असे कंपनीचे नाव आहे. कुरिअर कंपनीचे कर्मचारी एक पार्सल सोडत असताना हा स्फोट झाला. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. स्फोट नेमका कशामुळे हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.