Home » Uncategorized » *अंगणवाडी बांधकामासाठी निधी उपलब्ध करा :- आ.पंडीत *

*अंगणवाडी बांधकामासाठी निधी उपलब्ध करा :- आ.पंडीत *

  1. *अंगणवाडी बांधकामासाठी निधी उपलब्ध करा :- आ.पंडीत *
    ………………………………………………..

*आ. अमरसिंह पंडित यांची विधान परिषदेत मागणी*
———————————-

मुंबई ता. २० (प्रतिनिधी) –
बीड जिल्ह्यातील अंगणवाड्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे, शासनाने जिल्ह्यातील ५५० अंगणवाडी केंद्र बांधकामासाठी सन २०१५-१६ मध्ये १८.५६ कोटी रुपये निधी मंजुर केला होता हा निधी अखर्चीत का राहिला,याला जबाबदार कोण आहे. जिल्हा परिषदेने वारंवार आरसीसी बांधकामाची मागणी केलेली असतांनाही शासनाने त्यास परवानगी का दिली नाही ? अखर्चीत राहिलेला निधी आता व्यापगत झाला आहे,शासनाने पुन्हा बीड जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी आ. अमरसिंह पंडित यांनी केली. विधान परिषदेत तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातुन त्यांनी हा विषय विधान परिषदेत मांडला.

बीड जिल्ह्यात २४०६ अंगणवाडी केंद्र असुन यापैकी केवळ १३२० अंगणवाडी केंद्रांना शासकीय इमारत आहे. काही अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरतात तर काही समाज मंदिर आणि शाळेच्या इमारतीत सुरु आहेत. जिल्ह्यातील शेकडो अंगणवाड्या उघड्यावर भरविल्या जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी हा गंभीर विषय विधान परिषदेत तारांकित प्रश्‍नाच्या मध्यमातुन उपस्थित केला. प्रश्‍नाच्या उत्तरात मंत्र्यांनी जिल्ह्यात एकही अंगणवाडी उघड्यावर भरत नसल्याचे लेखी कळविल्यानंतर आ. अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्यातील उघड्यावर भरत असलेल्या अंगणवाड्यांचे आपण व्हिडीओ चित्रीकरण करुन सभापती महोदयांच्या माध्यमातुन शासनाकडे देवु,खोटे उत्तर देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर शासन कारवाई करणार का ? असा थेट प्रश्‍न त्यांनी केला.

जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतीच्या गंभीर प्रश्‍ना बाबत वास्तव मांडतांना आ. अमरसिंह पंडित म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी प्रि-फॅब्रीकेटेड अंगणवाडी बांधकामास तिव्र विरोध केला,या बाबतचा ठराव घेवुन शासनाला वारंवार मार्गदर्शन मागितले गेले,मात्र शासनाने आरसीसी बांधकामास परवानगी दिली नाही. या कालावधीत हा निधी अखर्चीत राहिला यामुळे बीड जिल्ह्यातील सुमारे ५५० अंगणवाड्यांच्या इमारती होवु शकल्या नाहीत. अंगणवाडी बांधकामासाठी मंजुर असलेला निधी अखर्चीत राहण्यासाठी कारणीभुत असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आ. अमरसिंह पंडित यांनी केली. अखर्चीत राहिलेला निधी व्यापगत झाल्यामुळे पुन्हा हा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत त्या दृष्टीने शासन कोणती कारवाई करणार आहे ? असा प्रश्‍न उपस्थित करुन बीड जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाने निधी मंजुर करावा अशी अग्रही मागणी शेवटी आ. अमरसिंह पंडित यांनी केली.

नाशिक जिल्ह्यामध्ये प्रि-फॅब्रीकेटेड इमारती अतिशय चांगल्या झाल्यामुळे आपण अशा इमारती राज्यभरात करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला मात्र केंद्र शासनाने त्यास मंजुरी दिली नाही. आता आरसीसी पद्धतीने बांधकाम करण्याच्या सुचना दिलेल्या असुन बीड जिल्ह्यासाठी व्यापगत झालेला निधी पुन्हा मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे आश्‍वासन महिला व बालविकास मंत्री यांनी आपल्या उत्तरात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.