Home » Uncategorized » *समाजकल्याण कार्यालयावर आंदोलनं करणार–सचिन उजगरे*

*समाजकल्याण कार्यालयावर आंदोलनं करणार–सचिन उजगरे*

*समाजकल्याण कार्यालयावर आंदोलनं करणार–सचिन उजगरे*

* निर्वाह भत्ता व स्टेशनरी साहीत्य निधी अभावी विद्यार्थ्यांची हेळसांड.

माजलगाव /रविकांत उघडे

शासनाने जिल्ह्यातील समाज कल्याणच्या शासकीय वस्ती गृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात अद्याप पर्यंत निर्वाह भत्ता व स्टेशनरी साहित्य निधी न दिल्या मुळे आर्थिक दुर्बल घटक,अनुसूचित जाती,जमाती,व इतर समाजातील गरजू विद्यार्थ्यांना त्याचा चांगला च फटका बसला असून वर्ष सरले तरी अद्याप पर्यंत त्यांना कसला ही निधी भेटला नाही.या संदर्भात लढा मानव मुक्तीचे सचिन उजगरे हे मागील कित्येक दिवसांपासून समाजकल्याण विभागाशी पाठपुरावा करत आहेत.तरी शासन स्तरावर त्याला पहींजे तसी दाद मिळत नसल्याने त्यांनी लवकरच आंदोलनं करण्याचा निवेदन समाज कल्याण कार्यालयास दिले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, मागसवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटक, विद्यार्थीची शिक्षणामध्ये अडथळा निर्माण न होता विद्यार्थीस योग्य शिक्षण घेता यावे यासाठी तालुक्याच्या ठिकानी सर्व सोयी युक्त भव्य शासकीय ईमारत बाधुन या ठिकाणी शासन नियमाने विद्यार्थीस प्रवेश दिला जातो. प्रवेशास पात्र सर्व विद्यार्थीस शैक्षणिक उदीष्ट पुर्ण करण्यासाठी निधी दिला जातो.
भारतीय राज्य घटनेचे कलम 46 नुसार हा निधी विद्यार्थ्यावर खर्च करण्याची तरतूद आहे.
शासन स्टेशनरी साहीत्यास वर्षभरासाठी एका विद्यार्थीस साधारणतः 4000 रू. देण्यात येते या सह निर्वाह भत्ता व गणवेश भत्ता आदी खर्च विद्यार्थीवर केला जातो .
पण जिल्हायातील शासकीय वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीस आद्याप निर्वाह भत्ता व स्टेशनरी चा निधी प्राप्त झाला नाही. शासकीय वस्तीगृह येथे शासन नियमाधिन राहून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात अशा विद्यार्थ्यांना योग्य वेळात निधी उपलब्ध होत नसेल तर त्याचे शैक्षणिक उद्दिष्ट कसे पूर्ण होतील असा प्रश्न उपस्थित करून समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रकारचा निधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतो का नाही हे लवकरच लढा मानव मुक्तीच्या वतीने जिल्हाभर तपासले जाईल नसता.
लढा मानवमुक्तीचा या सामाजिक चळवळीच्या वतीने संवैधानिक आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी.असा इशारा सचिन उजगरे यांनी समाजकल्याण अधिकारी बीड यांना निवे दना द्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.