Home » Uncategorized » *मोहनराव जगताप यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन*

*मोहनराव जगताप यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन*

*मोहनराव जगताप यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन*

 

माजलगाव – रविकांत उघडे

 

आज शहरातील ईदगाह काँर्नर येथे मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या शाखेच्या वतीने मोहनराव यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगाव नागरीचे नगराध्यक्ष सहाल भैय्या चाऊस हे होते. या कार्यक्रमा प्रसंगी माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे,संतोषराव यादव,मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष तथा बांधकाम सभापती शरद भैय्या यादव,नगरसेवक सुशील लोढा, नगरसेवक इम्रान भाई,शहर अध्यक्ष फेरोज भाई इनामदार, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष हितेंद्र काळे देपेगावकर,सोशेल मीडिया तालुकाध्यक्ष राजेश स्वामी, रामेश्वर पठाडे, विजयराव शेजुळ,कल्याण शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोहनराव जगताप म्हणाले की मित्र मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजकार्य करून कार्यकर्त्यांनी जनतेच्या उपयोगी पडावे व गरजूंना मदतीचा आधार द्यावा .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख खदीर,खाजाभाई,युनूस बाडेभाई,राहुल वाघमारे, राहुल बावणे, विनोद गोपाळ,सय्यद जमील भाई, विकी खोपे,गब्बर भाई,शाखा अध्यक्ष जहीर खान, इम्रान शेख, जावेद खान,शेख राजू, अखिल बागवान,शाहबाज शेख, शेख मोसिन शेख बाबा आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.