Home » Uncategorized » *पत्रकार स्व.भास्कर चोपडे यांच्या शोकसभेचे आयोजन*

*पत्रकार स्व.भास्कर चोपडे यांच्या शोकसभेचे आयोजन*

*पत्रकार स्व.भास्कर चोपडे यांच्या शोकसभेचे आयोजन*

 

 

उपस्थित राहण्याचे मराठी परिषदेचे आवाहन

 

बीड ( प्रतिनिधी)-पत्रकारितेमध्ये अनेकांना न्याय देवून आपला ठसा उमटविणारे स्व. पत्रकार भास्कर चोपडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने बुधवारी दि.21 मार्च रोजी येथील शासकिय विश्रामगृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून स्व. भास्कर चोपडे यांनी पत्रकरितामधून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. पत्रकारितेमधील त्यांच्या उल्लेखनिय कार्यामुळे त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बीडच्या पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटविणार्‍या या जेष्ठ पत्रकारांचे नुकतेच दुःखत निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने बुधवारी दि.21 मार्च रोजी दुपारी एक वाजता येथील शासकिय विश्रामगृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व संपादक, पत्रकार, वर्तपत्र विक्रेते यांनी या शोकसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे राज्य सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सदस्य विशाल सांळूके, विलास डोळसे, उत्तम हजारे, दत्त आंबेकर, शेखर कुमार, आशोक खाडे यांच्यासह परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published.