Home » Uncategorized » ‘तिची’ चक्क उपोषणस्थळीच प्रसूती झाली.

‘तिची’ चक्क उपोषणस्थळीच प्रसूती झाली.

‘तिची’ चक्क उपोषणस्थळीच प्रसूती झाली.

डोंगरचा राजा प्रतिनिधी । बीड

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी एक म्हण आपल्याकडे नेहमी वापरली जाते. याच म्हणीचा प्रत्येय बीडमध्ये आला आहे. घरकुलासाठी सरकारने राबवलेल्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नसल्याचे वास्तव बीडमध्ये समोर आले आहे. येथे घरकुलाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या पारधी समाजातील एक महिला उपोषण स्थळीच प्रसूती झाली. सोमवारी पहाटे प्रसूती झालेल्या या महिलेचे नाव आहे सुरेखा शहाजी पवार.

डोक्यावर रहायला ना छप्पर आहे ना खायला पोटभर भाकरं अशा विवंचनेत सापडलेल्या बीड तालुक्यातील वासनवाडी येथील या पारधी समाजाची मोठी हेळसांड सुरू असल्याचे चित्र आहे. मागील पाच दिवसापासून घरकुलासाठी नऊ महिन्याचा गर्भ पोटात घेऊन ती महिला उपोषणाला बसली होती. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या सुरेखा नावाच्या महिलेची प्रसूती (डिलेव्हरी) चक्क उपोषणाच्या कट्यावरच झाली. एकीकडे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘बेटी बचाव बेटी पडाव’ जाणीव जागृती अभियानाची रथयात्रा आली होती तर दुसरीकडे रथयात्रेच्या बाजूलाच घरकुलाची मागणी करणारी पारधी समाजातील महिला उपोषण स्थळीच प्रसूती झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.