*माजलगांव बीड जिल्ह्यातच राहणार-आ. देशमुख*
*पत्रकारांच्या साखळी उपोषणाची सांगता.
*पत्रकारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
माजलगाव/रविकांत उघडे
“””””””””””””””””””””””””””””””””
प्रस्तावित अंबाजोगाई जिल्हयात माजलगांव तालुक्याचा समावेश करु नये तो बीड मध्येच कायम ठेवावा यासाठी माजलगांव पत्रकार संघाचे आंदोलन हे जनतेचे आंदोलन असून आपणही माजलगाव कुठल्याही परिस्थितीत बीड जिल्ह्यातच राहील याची काळजी घेऊ,पालकमंत्री पंकजा मुंडे यांचीही माजलगाव बीड मध्येच रहावे ही इच्छा असल्याचे आमदार आर टी देशमुख यांनी सांगून येत्या दोन दिवसात शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईल असे आश्वासन दिल्यानंतर मागील सात दिवसापासून सुरु असलेले पत्रकार संघाचे साखळी उपोषण रविवारी मागे घेण्यात आले.
येथील पत्रकार संघाचे वतीने माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातच रहावा यासाठी दि.१२ मार्च पासून साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते हे आंदोलन जनआंदोलन ठरले,या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी सात दिवसात विविध राजकीय पक्ष-संघटना,सामाजिक संघटना,व्यापारी महासंघ, ऑटो रिक्षा संघटना यांनी उपोषण करून पाठिंबा दिला तर जगताप मित्रमंडळाचेवतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. तालुका मुख्याध्यापक संघाचे वतीने या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला अध्यक्ष लक्ष्मण जगताप, प्रकाश लोखंडे, मुख्याध्यापक प्रभाकर साळेगावकर,भारत गोपाळ,बाळासाहेब सोनवणे,धुराजी चाळक, नीलकंठ जाधव,यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र पत्रकार संघास दिले.
रविवारी सातव्या दिवशी पत्रकारासंमवेत मराठा सेना व शिवराय प्रतिष्ठानचे वतीने राजाभाऊ शेजुळ,हनुमान भोरे,दिनेश रांजवन,गौरव काळे,उमेश जाधव,रोहित ननावरे,लक्ष्मण सावंत,विजय रांजवन,सुरेश मोरे,विकास खापे, अशोक चोरमले,गणेश तावरे,राहुल बावणे,विकी खापे,राहुल चिने उपोषणात सहभागी झाले होते, तसेच मल्हारसेनेचे अशोक डोने,तुकाराम येवले,जगदीश शिंदे,हरी गलांडे,रामेश्वर सरवदे,अशोक अर्जुन, विलास नेमाने,धर्मराज अर्जुन यानीही उपोषण केले.तर वडवणीचे बजरंग साबळे,औदुंबर सावंत,विश्वास आगे,सचिन लंगडे,लखन महागोविंद,दादा गोरे,केरबा तपसे, नामदेव हुलगे,अविनाश कांडूरे,जीवन राठोड,पी आर काथुळे, टी एन शिंदे,डॉ साहेब राठोड,मनोज जगताप,केशव भारती यानीही उपोशंकर्त्यांना भेटी देऊन पाठिंबा दिला. यावेळी आमदार आर टी देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली माजलगाव तालुका कदापीही अंबाजोगाईमध्ये जाणार नाही असे सांगून माजलगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग आता बीड विभागात लवकरच समाविष्ट होणार असल्याचे सांगितले. यावेळी देशमुख यांच्या विनतीस मान देऊन साखळी उपोषण मागे घेण्यात आले.
****साखर कारखान्यांचा पाठिंबा***
तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांनी रविवारी उपोषणास भेट देऊन आपला लेखी पाठिंबा दिला. यापूर्वी छत्रपती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शिंदे यांनी लेखी पत्र देऊन पाठिंबा दिलेला आहे.
**उपविभागीय अधिकारी यांचा निषेध**
मागील सात दिवसापासून पत्रकारांचे साखळी उपोषण सुरू असताना व तसे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दि.९ रोजी देण्यात आले असताना उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार या सात दिवसात एकदाही उपोषणस्थळी फिरकल्या नाहीत,लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाचे जनहितासाठी आंदोलन सुरू असताना त्यांनी दखल घेतली नाही.त्यामुळे त्यांचा आमदार देशमुख यांचे उपस्थितीत पत्रकारांनी निषेध केला.