Home » मनोरंजन » कलाकार भूमिकेसाठी भीक मागतात: ऋषी कपूर  

कलाकार भूमिकेसाठी भीक मागतात: ऋषी कपूर  

सोशल मीडियावर एखादी पोस्ट असो किंवा कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद, अभिनेते ऋषी कपूर यांची वादग्रस्त विधानं नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. सवयीप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा नवं वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक मंडळी आहेत, ज्यांना अजिबात अभिनय करता येत नाही आणि ते कलाकार भूमिकेसाठी भीक मागतात’ असं ऋषी कपूर यांनी म्हटलंय.

एका मुलाखतीदरम्यान ऋषी कपूर यांनी हे वक्तव्य केलंय. ‘आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना कामं मिळतायेत परंतु, त्यांना अभिनय करता येत नाही. अभिनय करणं काय असतं हेच मुळात त्यांना माहीतच नाही. चित्रपटात भूमिका मिळावी म्हणून भीक मागणं आणि वशिल्यानं भूमिका पदरात पाडून घेणं चुकीचं आहे,’ असंही त्यांनी म्हटलंय.

ऋषी कपूर यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले, तरी त्यांच्या या वक्तव्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. सोशल मीडियावर अनेक मंडळींनी त्यांना ट्रोल करायलाही सुरुवात केलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Leave a Reply

Your email address will not be published.