Home » Uncategorized » रेल्वे मार्गाचे काम सोमवारी बंद पडणार

रेल्वे मार्गाचे काम सोमवारी बंद पडणार

रेल्वे मार्गाचे काम सोमवारी बंद पडणार .

प्रकाश सोळंके नेतृत्व करणार .

मावेजा कमी मिळाला , शेतकरी संतप्त

वडवणी ;- रेल्वे मार्गात गेलेल्या जमिनीचे मावेजा प्रकरण आता चांगलेच तापले असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार पासून काम बंद पडण्याचा इशारा दिला आहे .

नगर – परळी -बीड रेल्वे मार्गाचे प्रलंबित कामाची सुरुवात झाली आहे. वडवणी तालुक्यात रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे वडवणी ,बाहेगव्हान,मोरवड,हिवरगव्हान,उपळी,बाबी आदि गावातील जमिनी या रेल्वे मार्गात गेल्या आहेत.मात्र रेल्वे मार्गात गेलेल्या जमिनीचा मावेजा केवळ ११०० ते १३०० रुपये गुंठा या प्रमाणे देण्यात आला .

वडवणी बाहेगव्हान सह तालुक्यातील गावातील जमिनीला एकीकडे प्रतिगुंठा चार ते पाच लाखाचा भाव असताना कमी भावाने शासन जमिनी हडप करीत असल्याचा आरोप या गावातील शेतकऱ्यांनी केला आहे.या अगोदर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एकरी किमान पन्नास लाखाचा मावेजा दयावा तसेच रेल्वे खात्यात प्रकल्प ग्रास्तांची मुले नोकरीत घेण्याची मागणी केली होती एवढेच नव्हे तर  विष पिवून आत्महत्त्या करण्याचा इशाराही दिला होता या बाबतीत आता वडवणी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत नुकतीच बाहेगव्हान येथे शेतकऱ्यांची बैठक झाली वडवणी शहरातील तसेच परिसरातील गावच्या शेतकऱ्यांनी १९ मार्च पासून काम बंद पाडण्याचा इशारा दिला असून या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री प्रकाश सोळंके करणार असल्याचे बैठकीत ठराव घेण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published.