Home » Uncategorized » *भाजपाचे विराट रूप ६ एप्रिलला दाखवा*

*भाजपाचे विराट रूप ६ एप्रिलला दाखवा*

*भाजपाचे विराट रूप ६ एप्रिलला दाखवा*

* संघटनात्मक बांधणी आवश्यक – ना.मुंडे*

_नांदेड येथे बैठक व महामेळाव्याचे उद्घाटन_

नांदेड दि. १७ —– अकरा कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पक्ष हा आज जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजे येत्या ६ एप्रिल रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेवून भाजपचे विराट दर्शन घडवावे असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी मजबूत संघटनात्मक बांधणी आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भाजपच्या पदाधिका-यांची विभागीय बैठक व ६ एप्रिल चलो मुंबई संदर्भात महामेळाव्याचे उद्घाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मातोश्री मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, खा. सुनील गायकवाड, आ. आर. टी. देशमुख, आ. तानाजी मुटकुळे, आ. विनायक पाटील, आ. तुषार राठोड, भाजप नेते डी. बी. पाटील, माधवराव किन्हाळकर, सुर्यकांता पाटील, संतुकराव हंबर्डे, राम पाटील रातोळीकर आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, भाजपा हा पक्ष नसून माझं कुटूंब आहे. आज मला माहेरी आल्यासारखं वाटत आहे. कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच आज आम्ही मंत्री आहोत. लोकनेते मुंडे साहेबांचा वारसा असल्याने लहानपणापासून पक्षाच्या जडणघडणीतच मी लहानाची मोठी झाले,पक्षासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांची आठवण ठेवून कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले पाहिजे. समस्या जरूर आहेत पण त्याला धरून न बसता सकारात्मक चर्चा करा. आज देशातील २१ राज्यात भाजपची सत्ता आहे, मिळालेला विजय टिकवायचा असेल तर सत्तेची किंमत ओळखून काम करा असे आवाहन त्यांनी केले. सेनापतीची दृष्टी व सेनेची शक्ती या दोन गोष्टी कोणतीही लढाई जिंकून देतात असेही त्या म्हणाल्या.

*मुंबईत विराट दर्शन घडवा*
——————————–
६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस अर्थात वाढदिवस आहे. यादिवशी मुंबईत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणा-या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे आहे. पक्षासाठी एक दिवस द्या. मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होवून संघटनेचे विराट दर्शन घडवा असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले.

कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलनाने झाली. बैठकीत विविध जिल्हयाच्या बुथ समित्यांचा आढावा घेण्यात आला. हिंगोलीचे दिवंगत ब्रिजलाल खुराणा व आ. कुंडलिकराव नागरे यांच्या निधनाबद्दल बैठकीत दोन मिनीटं स्तब्ध उभा राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
•••••••

Leave a Reply

Your email address will not be published.