*पत्रकारांचे आंदोलन ठरले जन आंदोलन*
माजलगांव बीड जिल्ह्यातच ठेवा
– पाच उपोषणे.
– रास्ता रोको.
– वाहतुकीचा खोळंबा.
माजलगांव /रविकांत उघडे
“”””””””””””””””””””””””””””””””””
प्रस्तावित अंबाजोगाई जिल्हयात माजलगांव तालुक्याचा समावेश करु नये तो बीड मध्येच कायम ठेवावा यासाठी माजलगांव पत्रकार संघाच्या वतीने सुरु करण्यात आलेले आंदोलन शनिवारी जनआंदोलन ठरले,या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी शनिवारी तब्बल पाच उपोषणे व जगताप मित्रमंडळाचेवतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आल्याने आता जनतेतूनच उठाव केल्याने आंदोलनाने मूर्त स्वरूप प्राप्त केले आहे.
सोमवार दि. 12 मार्च पासुन येथील आंबेडकर चौैकात पत्रकारांचे वतीने सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणाच्या सहाव्या दिवशी शनिवारी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने शाखेचे अध्यक्ष सुहास देशमुख,माजी आमदार डि के देशमुख,प्रभाकर साळेगावकर,सुमंत गायकवाड,गणेश मुलाटे ,अभिमन्यू ईबीते,प्रदीप भिलेगावकर,शिरीष देशमुख,धोंडीराम रामुळे,राजाराम शिवणकर,यांनी उपोषण करून आंदोलनास पाठिंबा दिला.भारीपचे तालुकाध्यक्ष धम्मानंद साळवे,डॉ सुहास टाकनखार,भय्या प्रधान,अस्वीन टाकणंखार,प्रशांत उपदेशी,यांनी उपोषणात सहभाग घेतला. शेकापचे ऍड नारायण गोले,ऍड अरुण काळे,ऍड शिवाजी निंबाळकर,तुळशीराम रेडे,रणजित जाधव,राजाभाऊ दळवी,गणेश नावडकर,गौतम सोळंके,बाळासाहेब शिंदे,यांनी उपोषण करून पाठिंबा दिला. ऑटोरिक्षा चालक मालक संघटना( लाल बावटा ) मुत्सदीक बाबा यांचे मार्गदर्शन खाली नासिर कुरेशी,सादिक पठाण,अहमद खान,शेख चुन्नु,शेख अखिल,शेख अलीम, हुसेन,सलीम,सलमान यांनी आज आपला व्यवसाय बंद ठेऊन उपोषण करून पाठिंबा दिला.
तालुक्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जनतेतुन मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज या उपोषनास प.स.सभापती प्रतिनिधी जयदत्त नरवडे,उपसभापती सुशील सोळंके,मिलिंद लगाडे, चंद्रकांत वानखेडे,यांनी भेट देऊन माजलगाव बीड मध्येच ठेवा अशा आशयाचा संमत केलेला ठराव पत्रकारांना दिला. डॉ शंकर जुजगर,सईद सलीम,डॉ मकसूद शेख,विलास साळवे,सिटूचे शिवाजी कुरे,किसन पाटील,डॉ सचिन देशमुख,डॉ शैलेश पाठक, माजी उपाध्यक्ष कचरूतात्या खळगे आदिंनी उपोशंकर्त्यांना भेट देऊन पाठिंबा दिला. राजकीय,सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नेते,पदाधिकारी , विविध पक्षांचे कार्यकर्ते ,व्यापारी व नागरिकांनी पत्रकारांची भेट व आंदोलनास उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला,व सर्वजण एकजुटीने आंदोलनात सहभागी झाले. आजच्या दिवशी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सुरेंद्र रेदासनी,अशोक शेजुळ,नंदू अनंदगावकर ,गणेश लोहिया यांनी मार्गदर्शक अनंत रुद्रवार यांचेसह व्यापार्यानी भेट देऊन उपोषणात सहभाग नोंदवला व ठराव मंजूर करून आंदोलनास पाठिंबा दिला.मल्हार सेनेच्या वतीने आज साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा दिला याचे निवेदन दिले यावेळी तुकाराम येवले,बबनराव सरवदे,अशोक डोने,विलास नेमाने,प्रभाकर धरपडे,अशोक अर्जुन,लिंबाजी आबुज,देवा मुळे यांची उपस्थिती होती
**रास्ता रोको**
माजलगाव बीड जिल्ह्यातच ठेवावे यासाठी सुरु असलेल्या पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून मोहन जगताप मित्रमंडळाचे वतीने शनिवारी सकाळी अकरा वाजता सिंदफणा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. या आंदोलनात छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप,अच्युत लाटे,शरद यादव,संतोष यादव,भगवान देशमुख, नानाभाऊ शिंदे,राजू वापटे, राम जगताप,दामोदर घायतिडक,फारूक इनामदार,अविनाश गोंडे,विठ्ठल लगड,मझर् देशमुख,उद्धव नागरगोजे,सुरेश एरंडे,डॉ सुशील लोढा,राधकीसन सोनवणे,मच्छिद्र काळे,तालेब चाऊस,दिलीप घुबडे,आदी आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. यावेळी नायब तहसीलदार रामदासी यांना मित्र मंडळाचे वतीने निवेदन देण्यात आले.