*डॉ आंबेडकरांमुळेच राष्ट्राचे उत्थान – गृहमंत्री सिंह*
*राष्ट्रीय अधिवेशनाचे ना.सिंहांच्या हस्ते उदघाटन*
*ना.आठवले हे भारत घडविण्याचे काम करतात.ना.सिंह यांचे गौरवोद्गार*
नविदिल्ली दि.16 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जातीव्यवस्था मजबूत करणारा नव्हता तर या देशातील जातीभेद मिटविणारा जातीव्यवस्था नष्ट कारणारा जातीअंताचा विचार होता. त्यांच्या जातीअंताच्या विचारांमुळेच भारत राष्ट्राचे उत्थान होईल. जोपर्यन्त या देशातील दलित शोषित पीडितांचे गरिबांचे उत्थान होणार नाही तोपर्यंत भारताचे उत्थान होणार नाही असे मत केंद्रीय गृह मंत्री ना राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उदघाटन नविदिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये ना राजनाथ सिंहांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले उपस्थित होते. तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि मोहनलाल पाटील उपस्थित होते.या अधिवेशनास देशभरातून हजारो रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते. ना रामदास आठवले यांच्या सुविद्य पत्नी सौ सिमाताई आठवले व पुत्र जित आठवले उपस्थित होते.
मित्रपक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास संबोधित करण्याची पहिल्यांदाच सुसंधी लाभल्याचे सांगत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे केवळ रिपब्लिकन पक्षाचे काम करीत नसून संपूर्ण भारताच्या सशक्तीकरणासाठी झटत असल्याचे गौरवोद्गार काढून ना. राजनाथ सिंह यांनी ना. रामदास आठवले हे केवळ एका जातीचे किंवा एका पक्षाचे नेते राहिले नसून संपूर्ण भारताचे नेते झाले असल्याचे सूचित केले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खरी पार्टी म्हणून आरपीआय एनडीए मध्ये सहभागी झाल्याचा अभिमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आहे . केंद्रियमंत्रीमंडळात रामदास आठवले चांगले काम करीत आहेत.आगामी सन 2019च्या निवडणुकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणुका जिंकून पुन्हा सरकार मोदिंच्याच नेतृत्वात बनेल व त्याही मंत्रिमंडळात रामदास आठवले हे केंद्रीयमंत्री असतील असा बुलंद विश्वास ना राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. विश्वातील टॉप 10 मध्ये भारताचे नाव आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करताना पुढील काही वर्षात भारत पहिल्या 5 मध्ये आणि त्यानंतर विश्वातील टॉप नंबर वन ची अर्थव्यवस्था असणारा देश भारत होईल याचा आम्हाला विश्वास असल्याचे ना राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जाती तोडण्याचा आणि देश जोडण्याचा विचार आहे. देशात दलित अत्याचार होतात त्यास या देशातील जातीवाद कारणीभूत आहे. जातीभेद मिटविण्यासाठी या प्रश्नाकडे राजकीय दृष्टीने न बघता सामाजिक दृष्टीने बघावे असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा आणि आंबेडकरी तत्वज्ञान घेऊनच आम्ही भाजप सोबत युती केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला मानणारे ; संविधानाचे रक्षण करणारे तसेच दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करणारे प्रधानमंत्री आहेत. ते सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास साधणारे प्रधानमंत्री आहेत. देशभरातील गरिबांसाठी झोपडीवासीयांना; बेघर असलेल्यांना केंद्रसरकार पक्के घर देणार आहे. सवर्ण समाजातील गरिबांना आर्थिक निकषावर 25 टक्के आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढवून 75 टक्क्यांपर्यंत करण्यासाठी संसदेत नवीन कायदा करावा .अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली. या अधिवेशनास महाराष्ट्र्राचे रिपाइंचे अध्यक्ष भुपेश थुलकर; सरचिटणीस राजाभाऊ सरवदे; कार्याध्यक्ष बाबुराव कदम ; माजी आमदार अनिल गोंडाने; तानसेन ननावरे ; काकासाहेब खंबाळकर; सौ शिलाताई गांगुर्डे; एड.अशा लांडगे एड.अभयाताई सोनवणे; स्वप्नाली जाधव; राजीव मेनन; अनिलभाई गांगुर्डे; गौतम भालेराव ;गौतम सोनवणे; श्रीकांत भालेराव; अंकुश गायकवाड;किशोर मासुम; हेमंत रणपिसे ;अरुण पाठारे; देवेंद्र रणपिसे; मनोज रणपिसे; सौ नैनाताई वैराट; किशोर मगरे; किरण पगारे; आरिफ तांबोळी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.