*गुढीपाडवा ते रामनवमी भव्य कीर्तन महोत्सव*
-दूरदर्शन वरील कलाकारांची विशेष उपस्थिति-
वडवणी (प्रतिनिधि) :प्रतिवर्षा प्रमाणे संत भगवानबाबा मंदिर, साळींबा रोड, वडवणी जि. बीड येथे पारंपरिक नामसप्ताह नामवंत कीर्तनकार व संगीत विशारद मंडळींच्या उपस्थिति मध्ये पार पडत आहे.
पूर्वी हा सप्ताह संत भगवानबाबा व संत भिमसिंह बाबांच्या दोन कीर्तनसेवेच्या रुपात पार पडत असे. रणरणत्या उन्हात या परिसराला यात्रेचे स्वरुप येत असे. हजारों भाविक कीर्तन श्रवणाचा लाभ घेत असत. भव्य अन्नदान होत असे. याच वेळी येथे कुस्तीचे फड लागत असत. दिल्लीच्या पैलवानाची अंतिम कुस्ती येथे रंगली गेली होती.
पण काळाच्या ओघात या सप्ताहाचे वैभव कमी झाले. संप्रदायाची ओढ कमी झाली, लोक घरातून बाहेर निघेनासे झाले. या सप्ताहाचे गतवैभव परत मिळवून हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या वर्षी दि. 18/03/2018 गुढीपाडवा ते 25/03/2018 रामनवमी भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. दूरदर्शन कलाकार केशव बडे, चित्रपट अभिनेत्री साक्षी आंधळे, महिला किर्तनकार ज्ञानेश्वरीताई घुले, मध्यप्रदेशचे डॉ. तुलसीरामजी गुट्टे हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण असेल. फुगडी, नृत्य व भजन संध्या रोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत असेल. शिक्षक कर्मचारी, सराफा व्यापारी, वैद्यकीय संघटणा, औषधि व्यापारी यांनी कीर्तन सेवा आयोजित केली आहे. महोत्सवाला नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे, बन्सीभाऊ मुंडे, सतिषबप्पा बडे यांचे विशेष योगदान आहे. सौंदड वस्ती, तिकाटने, सरकार खोरी, मोंढा परिसर, बुरूजदरा, कैकाडनी, जोडांबा या परिसराचे सात दिवस अन्नदान राहील. बीडच्या किर्तन महोत्सव प्रमाणे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी जिल्हा भरातून सर्व भगवानबाबा भक्तांनी अवश्य उपस्थिती दर्शवावी असे आव्हान संत भगवानबाबा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रविंद्रभाऊ मुंडे, सचिव योगेंद्र मुंडे यांनी केले आहे. बाहेरगावच्या भाविकांनी राहण्याची व जेवनाची सोय करण्यात आली आहे.