वडवणीत शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन
”#वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने शेतकर्याच्या विविध मागण्यासाठी भारतीय स्टेट बॅके समोर ढोल बजाव आंदोलन..
———————-
वडवणी तालुक्यातील शेतकर्यांच्या कर्ज माफीच्या यादया मराठीत लावण्यात यावे तसेच प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामपंचायत यादया मराठीत चिटकवुन तालुक्यातील ग्रामपंचाततीमध्ये चावडी वाचन करून सविस्तर माहिती देण्यात यावी.असे शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने ,शिवसेना बीड जिल्हा संपर्क मंञी रामदास कदम व शिवसेना बीड जिल्हा संकर्क प्रमुख सुधीर मोरे साहेब ,शिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन भैय्या मुळुक मा.जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना वडवणी तालुका प्रमुख #_विनायक मुळे यांच्या नेत्तवाखाली sbi शाखेच्या पुढे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.या वेळी बॅक मॅनिजेर यांना मागण्याचे निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख #_विनायक मुळे ,शहर प्रमुख नागेश डिगे,शिवसेना नगरसेवक तथा सभापती कचरू जाधव ,रामदास ढगे,बंडु जाधव,वचिष्ट शेंडगे,युवराज शिंदे, महिला आघाडी च्या प्रमिला माळी ,सर्जराव जोगदंड,बाळासाहेब लोकरे,नरद्रे राठोड,भैय्या खोसे,संजय धपाटे,दत्त्ता आलगट, दत्ता सावंत,प्रताप ,माञे,रोहित जाधव,नवनाथ मोरे,राहुल काळे,रामेश्वर जेधे,गोंडे पाटिल, सचिन दिवटे,बळीराम चौरे,भानदास चौरे,नामदेव पडुळकर आदि शिवसैनिक शेतकरी व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.