Home » Uncategorized » जिल्हा कचेरीवर धडकला सम्यक  विद्यार्थी आंदोलनाचा मोर्चा

जिल्हा कचेरीवर धडकला सम्यक  विद्यार्थी आंदोलनाचा मोर्चा

जिल्हा कचेरीवर धडकला सम्यक
विद्यार्थी आंदोलनाचा मोर्चा
 
सरकारचे शिष्यवृत्ती धोरण विद्यार्थ्यांच्या मुळावर;
शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शिष्यवृत्ती जमा नाही
बीड,दि.15(प्रतिनिधी):- एकीडकडे शिक्षणाचा पोकळ गाजावाजा करणारे सरकार दुसर्‍या बाजूने मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले आहे, अद्यापही शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. एवढेच नाही तर 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा फायदा दिला जाईल, ही जाचक अट रद्द करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती तात्काळ जमा करा. अशी मागणी पुढे करत भारीपचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व  भारिप प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार (दि.15) रोजी बीड जिल्हा कचेरीवर मोर्चा काढीत सरकार धोरणाच्या विरोधात तीव्र निदर्शने करित घोषणाबाजी केली.
          जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने म्हंटले आहे की, संघ प्रणित भाजप सरकारसह सत्तेत असलेले इतर पक्षही एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, ईबीसी,  यांच्या प्रश्नांकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्र राज्याची नसून अवघ्या देशाची आहे. निवेदनात असेही म्हंटले आहे की, सुरवातीला मोठा गाजावाजा करीत सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाइन भरून घेण्याचे आदेश संबधित विभागाला दिले होते. परंतु शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आल्यानंतर सरकारने पुन्हा अचानक ही पद्धत बंध करित ऑफलाईन अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या, यातच विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ वाया गेलेला आहे. शिष्यवृत्ती लवकर खात्यावर जमा न झाल्यामुळे महाविद्यालयांकडून फिसचा तगादा सुरू झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा प्रश्न निर्माण झेलेला आहे. याची दखल घेत शासनाने तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांची शिष्यवृत्ती जमा करावी, शिष्यवृत्तीच्या (जीओआय) भ्रष्टाचारातील गुन्हेगारांना अटक करा, एस.सी. प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा दोन लाखांपासून पाच लाखांपर्यंत वाढवावी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा एक लाखापासून पाच लाखांपर्यंत करावी, ईबीसी प्रवर्गातील उत्पन्न आठ लाखांपासून दहा लाखांपर्यंत करावे, निर्वाह भत्ता सरसकट दरमहा पंधरा हजारांने वाढवावा, टाटा सामाजिक संशोधन संस्था (टीस) मधील विद्यार्थ्यांना शिशष्यवृत्ती पुर्ववत मिळाली पाहिजे.  आदी मागण्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जिल्हा प्रशासनाच्या दारात निवेदनाद्वारे मांडल्या आहेत. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महासचिव प्रकाश उजगरे,उपाध्यक्ष विजय गायकवाड, संघटक मिलिंद हराळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हा महासचिव, इंजि. प्रमोद बगाडे, राहूल वडमारे, राहूल डोंगरे, अजय सरवदे, जिल्हा संघटक ज्ञानेश्‍वर कवटेकर, अजय साबळे, धम्मानंद वाघमारे, विवेक कुचेकर, उपाध्यक्ष प्रविण मस्के, बिटू चव्हाण, बंटी पवार, शार्दुल वाघमारे, केतन प्रधान, महेश कांबळे, राहूल त्रीभूवन, आकाश पवार, अमर ससाणे, शुभम गायकवाड, कंस गायकवाड, अजय सिरसमट, पंकज मस्के, आनंद भोले, गगन त्रिभूवन, विश्‍वास कांबळे, विशाल थोरात, समाधान वक्ते, सतिष राठोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
चौकट
शिष्यवृत्तीत 1 हजार 868 कोटींचा घोटाळा ?
देशात शिक्षण व्यवस्थेत होत असलेल्या शिष्यवृत्ती भ्रष्टाचार समोर आला आहे. यात एकूण 1 हजार 868 कोटी रुपये विद्यार्थ्यांचे गडप करण्यात आलेले आहेत. म्हणून एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, ईबीसी  विद्यार्थ्यांच्या  हक्काची शिष्यवृत्ती थांबलेली आहे. जिल्हा परिषद, पालीकेच्या 80 हजार शाळा बंद करून खाजगी कंपनीला जागा व सुविधा देवून बाजारीकरण करून गोरगरीबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे. त्याकरिता या शासनाला जाग आणण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भरिपचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार गुरुवारी एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे विद्यार्थींच्या स्कॉलरशीप, फ्रीशीप प्रश्नाबाबत तसेच शिष्यवृती घोटाळा यासह अन्य मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published.