औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर
Updated Mar 15, 2018, 01:35 PM IST

मुंबई: कचरा प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार व दगडफेक केल्याच्या प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादवयांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी घोषणा केली. तसंच, या प्रकरणाची गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्या समितीच्या माध्यमातून एका महिन्यात चौकशी करण्यात येईल. औरंगाबादपरिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.