Home » ब्रेकिंग न्यूज » मिलिंद एकबोटेंना अटक : सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीणची कारवाई

मिलिंद एकबोटेंना अटक : सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीणची कारवाई

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण भडकावल्याच्या आरोपाखाली मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष असलेल्या मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी फेटाळला आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार भडकवल्याचा एकबोटेंवर आरोप आहे.

यापूर्वीही पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे एकबोटेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने गतवेळी त्यांना दिलासा दिला होता. परंतु, सरकारी पक्षाकडून एकबोटे हे तपासासाठी सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. परंतु, पोलीसच आपल्याला तपासाला बोलवत नसल्याचे एकबोटेंनी न्यायालयाला सांगितल्याचे म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.