Home » Uncategorized » बारमध्ये MRP मध्ये दारू; मद्यपींची चंगळ?

बारमध्ये MRP मध्ये दारू; मद्यपींची चंगळ?

बारमध्ये MRP मध्ये दारू; मद्यपींची चंगळ?

डोंगरचा राजा /आँनलाईन

एमआरपीपेक्षा अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून दारू विकणाऱ्या बारमालकांना सरकार दणका देण्याच्या विचारात आहे. वाईन शॉपप्रमाणे बारमध्येही यापुढे ‘एमआरपी’च्या दरानुसार दारू मिळणार असल्याने मद्यपींची चांगलीच चंगळ होणार आहे.

राज्यातील बारना ‘एफएल-२’ परवाना जारी करण्याच्या विचारात फडणवीस सरकार आहे. राज्यातील महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलायला सुरू केली आहेत. उत्पादन शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा विचारही राज्य सरकार करीत आहे. ‘एफएल-२’ परवाना मिळाल्यास मद्य विक्रीची परवानगी मिळते. परंतु, या परवान्यामुळे परिसरात मद्यपान करता येत नाही. सध्या बार आणि परमिट रुम्सना ‘एफएल-३’ हा परवाना दिला जातो. हा परवाना मिळाल्यास बार दारूची विक्री करू शकते. राज्य सरकारने बार मालकांना ‘एफएल-२’ हा परवाना दिल्यास मद्यप्रेमी बारमधून एमआरपीच्या दरात दारू विकत घेऊ शकतील. परंतु, ही दारू विकत घेतल्यानंतर त्यांना बारमध्ये बसता येणार नाही. ते हवे त्या ठिकाणी मद्यपान करू शकतात, असं महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बारना ‘एफएल-२’ हा परवाना दिल्यास त्याचा परिणाम आपल्या धंद्यावर होईल, अशी भीती वाईन शॉपमालकांनी व्यक्त केलीय. वाईन शॉप संघटनांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या बारमधील दारूवर ५ टक्के VAT आकारला जातो. तर ‘एफएल-२’ परवाना दिल्यास हा व्हॅट रद्द होणार आहे. दरम्यान, हा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतला नाही, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.