Home » ब्रेकिंग न्यूज » अमिताभ बच्चन यांचं मध्यरात्री भावनिक ट्विट

अमिताभ बच्चन यांचं मध्यरात्री भावनिक ट्विट

अमिताभ बच्चन यांचं मध्यरात्री भावनिक ट्विट

डोंगरचा राजा /आँनलाईन

राजस्थानमधील जोधपूर येथे ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांची अचानक प्रकृती बिघडली. सोशल मीडियावरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असतानाच अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री एक भावनिक ट्विट केलंय.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून मध्यरात्री एक जबरदस्त कविता ट्विट केली असून या कवितेत प्रकृती बिघडल्याचा उल्लेख केला. तसेच काळजी करणाऱ्या चाहत्यांचाही उल्लेख केला.

राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटाची शूटिंग सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडली. जोधपूरमधील वाढत्या तापमानामुळे अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम असून ते आज शूटिंगसाठी सेटवर परतणार आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता आमीर खानचा आज वाढदिवस आहे. आमीर खानचा वाढदिवस सेटवरच साजरा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.