वडवणी जवळील डोंगरावर तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
डोंगरचा राजा ऑनलाईन । बीड
बीड जिल्ह्यातील वडवणी शहराजवळील पोखरी येथे असणाऱ्या कान्होबा डोंगरावर १८ वर्षं वयाच्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. ही तरुणी भोळसर होती, त्यामुळे त्याचा फायदा घेऊन या तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे आसपासच्या प्रदेशात खळबळ माजली असून कान्होबा डोंगरावर नागरिकांनी गर्दी केली आहे.
मयत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, ती परभणीतील केसापुरी भागातील असल्याचं समोर येत आहे. शहरापासून २५ किलोमीटर दूर, बीड-परळी रस्त्यावर हा कान्होबा डोंगर आहे. या डोंगरावर फारशी वर्दळ नसते. त्यामुळे रात्री तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.