Home » ब्रेकिंग न्यूज » सरकारची नौटंकी सुरू आहे :अजित पवार

सरकारची नौटंकी सुरू आहे :अजित पवार

मुंबई, (प्रतिनिधी):-लाल वादळ मुंबईत धडकल्यानंतर सरकार खडबडून जागं झाली. त्यानंतर समिती स्थापन करून आज सरकारची नौटंकी सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

शेतकऱ्यांनी नाशिकपासून मुंबईपर्यंत शांततेनं मोर्चा काढलाय. कुणालाही यामुळे त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली गेली. किसान मोर्चाच्या नेत्यांनी लेखी आश्वासन घेतल्याशिवाय जाणार नाही असा निर्धार केलाय. पण जेव्हा असे मोठे मोर्चे निघतात तेव्हा सरकार अशा समिता स्थापन करतात. 6 मार्चला मोर्चा निघाला हे सरकारला माहित नव्हतं का ?, तर माहित होतं. काल मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला तेव्हा सरकार खडबडून जागं झालं आणि समिती स्थापन केली, आम्हाला वाटतं ते बरोबरच अशी धोरणा सरकारची चुकीची आहे अशी टीका अजित पवारांनी केली.

तसंच गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री आहे. त्यांनी मोर्च्यात सहभागी होणे हे शोभत नाही. त्यांनी नाशिकमध्येच शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करून त्यांना मुंबईत चर्चेला घेऊन येऊ शकत होते, मोर्चाला नाशिकमध्ये थांबवता आलं असतं पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, ही निव्वळ नौटंकी सुरू आहे अशी टीकाही अजित पवारांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.