Home » Uncategorized » माजी सैनिक मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद पाहूण समाधान- कर्नल विक्रम हेबले

माजी सैनिक मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद पाहूण समाधान- कर्नल विक्रम हेबले

बीड,:- अहमदनगर येथील सैन्यदलाच्या वतीने बीड येथे माजी सैनिकांसाठी मेळावा घेण्यात आला असून या मेळाव्यात माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्टॉल उभारण्यात आले असून या मेळाव्याचा लाभ माजी सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला हे पाहून समाधान वाटले. असे प्रतिपादन कर्नल विक्रम हेबले यांनी केले.

बीड येथील मल्टीपर्पज ग्राउंड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ ॲटोमोटीव्ह  रेजिमेंट  व  आर्मड कोर  सेंटर व स्कूल, अहमदनगरच्या माजी सैनिकांसाठी  मेळावा काल दि.11 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या मेळाव्यास नगरपरिषदेचे अध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षिरसागर, अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कर्नल धिरज त्रिपाठी, लेप्टनंट कर्नल राहूल सागा, मेजर आनंद जोशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले, कॅप्टन अरुण रामलिंगे माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना कर्नल विक्रम हेबले म्हणाले की, सैन्यदलामध्ये बीड जिल्हयातील  सैनिकांची संख्या मोठया प्रमाणात असून या सर्व माजी आजी सैनिकांचे असलेले प्रश्न किंवा अडीअडचणी जिल्हयात मेळाव्याच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सैन्य दलाने हा मेळाव्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मेळाव्यामध्ये जिल्हयातील सर्व  वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी व अवलंबितांचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. तसेच आरोग्यविषक काही प्रश्न असतील तर त्यांच्यासाठीही या कँम्पमध्ये आर्मीच्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये माजी व आजी सैनिकांनी आपल्या प्रलंबित प्रश्न सोडण्यासाठी संबंधित सैन्यातील अधिकाऱ्यांशी संर्पक करावे असही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना बीड नगरपरिषदेचे अध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षिरसागर म्हणाले की, बीड नगरपरिषदेच्या माध्यमातून  सैनिकासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात  येत असून  सैनिकांची नळपट्टी व घरपट्टी माफ करण्यात आली आहे. तसेच कँटीन, हॉस्पिटलसाठीही पालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे म्हणाले की, जिल्हयातील सैनिकांचे असलेल्या विविध अडीअडचणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हयातील सर्व  वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी व अवलंबितांच्या ज्या काही मागण्या  आहेत त्या मागण्या येणाऱ्या काळात सोडविण्यात येतील असे सांगून आजी व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बाजीराव केदार  व कॅप्टन अरुण रामलिंगे माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हयातील  वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नींचा कर्नल विक्रम हेबले व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षिरसागर यांच्या हस्ते भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. या मेळाव्यास सैन्य दलातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह जिल्हयातील सर्व वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी व अवलंबित मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.