कुठल्याही कामासाठी थोरामोठ्यांचा आशिर्वाद अन् पाठबळ असावे लागते. पंखात बळ असले तरी उडण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारा आपला माणूस असावा लागतो…. तो माणूस मला सरांच्या (मा.एस.एम.देशमुख) रुपात मिळाला. डोंगरचा राजा सुरु केला खरा पण त्यात सातत्य ठेवणं… सामाजिक प्रश्न मांडणं… हे करत असतांना समतोल ठेवणं अशा गोष्टी सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाल्या. आज डोंगरचा राजा ऑनलाईन झाला तोही सरांच्याच मार्गदर्शनामुळे… या वाटचालीत सरांनी दिलेल्या भक्कम पाठींब्यावरच वाटचाल करत आलो आहे… यापुढेही आपले मार्गदर्शन आणि साथ लाखमोलाची आहे.
आपला
अनिल