Home » क्राईम स्टोरी » तरुणाचा सापळा सापडला

तरुणाचा सापळा सापडला

माजलगाव, (प्रतिनिधी):-  तालुक्यातील घळाटवाडी येथील अंकुश एकनाथ लंगे हा २१ तरुण रागाच्या भरात माझे लग्न का करत नाहीत असे म्हणून घरातून ११ दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला होता त्याचा हाडाचा सापळा घळाटवाडी शिवारात आढळून आला.
या विषयी अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथील अंकुश एकनाथ लिंगे हा त्याच्या भावाला २८ फेब्रुवारी रोजी माझे लग्न का करून देत नाहीस म्हणून रागाने घर सोडून निघून गेला होता नातेवाईकाच्या साहायाने घरातील व्यक्तींनी हि त्याची चौकशी करण्यात सुरवात केली पण त्याचा कोठेही ठाव ठिकाण लागला नाही या नंतर दि.१० रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घळाटवाडी येथील गणेश जाधव रतन अटेगावकर हे शेतात गेले असता त्यांना बाबुराव चौधरी यांच्या शेताच्या शेजारी त्यांना मानवी हाडाचा सापाला असल्याचे आढळून आले. शेजारी बूट व कपडे असल्याने त्यांना त्यांच्या गावातील बेपत्ता झालेला तरुण असावा असा संशय आला त्यांनी गावात या गोष्टीची माहिती दिल्या नंतर त्याचे चुलत भाऊ नरहरी लिंगे याने त्याचे बूट व कपडे व पँटीच्या खिशात मोबाइल आढळून आल्याने हा सापाला अंकुशचाच असल्याची खात्री पटली त्यानंतर सदरील ठिकाणी माजलगाव ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सदरील ठिकाणी जाऊन पंचनामा केला हि घटना घळाटवाडी शिवारात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.सदरील घटना ही११ दिवसांपूर्वी घडल्याने मृतदेह वन्य प्राण्याने खाल्ले असल्याचे बोलले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published.