Home » माझा बीड जिल्हा » भास्कर चोपडे यांना मदतीबद्दल आभार 

भास्कर चोपडे यांना मदतीबद्दल आभार 

भास्कर चोपडे यांना मदतीबद्दल आभार

सर्वांचे मनापासून आभार.बीड येथील पुण्यनगरीचे पत्रकार भास्कर चोपडे यांच्यावर औरंगाबादच्या कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.पत्रकार असल्यानं स्वाभाविकपणे उपचार करणे ही आर्थिक परिस्थितीमुळं शक्य नव्हतं.त्यामुळं मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील पत्रकारांना आवाहन केल्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अनेकांनी भास्कर चोपडे यांना मदत केली आहे.अनेकांनी परस्पर चोपडे यांच्या खात्यावर रक्कम जमा केली.त्याचबरोबर पंकजाताई मुंडे,धनंजय मुंडे,निलमताई गोर्‍हे,धांडे,यांनीही आर्थिक मदत आणि सर्वप्रकारचे सहकार्य देण्याचे आश्‍वासन दिले.या मान्यवरांचे तसेच ज्यांनी ज्यांनी आमच्या आवाहनानुसार भास्कर चोपडे यांना मदत केली अशा सर्व मान्यवरांचे,पत्रकार मित्रांचे मनापासून आभार..काल मराठी पत्रकार परिषद बीडचे अध्यक्ष सुभाष चौरे यांनी रूग्णालयात जाऊन चोपडे यांची भेट घेतली.आज परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांनी चोपडे यांची भेट घेतली.मी देखील मोबाईलवरून त्यांच्याशी बोललो.प्रकृत्तीत सुधारणा होत आहे ही आनंदाची बाब आहे.भास्कर चोपडे लवकर बरे होतील आणि ते पुन्हा नव्या जोमाने लोकांचे प्रश्‍न लेखणीच्या माध्यमातून मांडू लागतील अशी अपेक्षा आहे.ः

एस.एम.देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published.