Home » माझा बीड जिल्हा » जलयुक्त शिवारच्या अनियमिततेची चौकशी – पंकजाताई

जलयुक्त शिवारच्या अनियमिततेची चौकशी – पंकजाताई

परळी दि. १०—   जलयुक्त शिवार योजना ही शेतकरी व पाण्यासाठी वणवण भटकणा-या माझ्या माय माऊलींसाठी अंमलात आणली आहे.दुर्दैवाने परळी येथे या योजनेत अनियमितता आली आणि एका चॅनलने ही बातमी अतिशोयक्ती पणाने दाखवली. या योजनेतील अनियमिततेची चौकशी करताना कसलाही राजकीय दबाव न आणता अधिका-यांना स्वातंत्र्य दिल्यामुळे च दोषींवर कारवाई झाली असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.  माय माऊलींसाठी आणलेल्या या योजनेतील दोषी अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व मजूर संस्था अशा कोणालाही शिक्षेपासून दूर ठेवले जाणार नाही, भलेही तो माझ्या घरचा माणूस असला तरी…

या प्रकरणातील मजूर संस्था, ठेकेदार कुणाच्या जवळचे आहेत हे स्वयंस्पष्ट झाले आहे. या प्रकरणात हस्तक्षेप न केल्यामुळेच अधिकारी स्वतंत्रपणे चौकशी करू शकले. जे चुकीचे आहेत, भलेही माझ्या घरचे असले तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तथापि दोषींवर कारवाई करताना निर्दोष यात गोवले जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जावी असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.