Home » ब्रेकिंग न्यूज » हौसाआई आठवले स्मृती पुरस्कार वितरण*

हौसाआई आठवले स्मृती पुरस्कार वितरण*

शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचार सक्षमपणे राबविण्याची ताकद महिलांमध्येच – ना. पंकजाताई मुंडे*
*दिवंगत हौसाआई आठवले स्मृती पुरस्कार सोहळ्याचे थाटात वितरण*
मुंबई, दि. १२—— शाहू,फुले आणि आंबेडकर यांचा समाजाचा सर्वांगिण विकास हाच विचार आणि हाच दावा होता. काही लोक त्यांच्या विचारांमध्ये भिंती निर्माण करीत आहेत. या भिंती काढून टाकणारेच खरे भारतीय नागरिक सल्याचे सांगून महिला हे काम सक्षमपणे करीत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास ,महिला व बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.
  दादर येथील रविंद्र नाट्य मंदिरमध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियांच्या महिला आघाडी तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, मातोश्री रमाई यांच्या संयुक्त जयंती सोहळया निमित्ताने आयोजित सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी काम करणाऱ्या रंणरागिनींच्या कर्तृत्वासाठी, दिवंगत हौसाआई आठवले स्मृती  पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, भाजप नेत्या  शायना एनसी , आशाताई लांडगे  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
   पुढे बोलतानि मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानदानाचे महान कार्य केल्याने आज आपल्या महिला भगिनी शिकत आहेत, राजमाता जिजाऊंनी  छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले तर मातोश्री रमाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुक्त समाजकार्य करु दिले.
    राज्यात मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली आहे त्या अंतर्गत जाणीव जागृती अभियान राबविण्यात आले. याची सुरवात राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव शिंदखेडराजा येथून केली.मातोश्री रमाई यांच्या जन्मगाव
वनंदगाव नंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव असलेल्या नायगाव येथे समारोप झाला.या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे मंत्री मुंडे यांनी  सांगितले. यावेळी हौसाआई आठवले स्मृती पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
●●●●

Leave a Reply

Your email address will not be published.