बीड (प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सिरसदेवी येथे गत नऊ वर्षापासून माता-बाल आरोग्य अबाधित राखण्यासाठी उल्लेखनिय काम करणार्या आशा स्वयंसेविका संगिता मोटे टाकळकर यांचा महिला दिनानिमित्त बीड येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सिरसदेवी येथे कार्यरत असतांना संगिता मोटे यांनी गेल्या नऊ वर्षापासून अविरत सेवा केली आहे. जे.एस.वाय, एच.बी.एन.सी.तसेच किशोरवयीन मुलींना शाळेवर जावून मार्गदर्शन, माहिती सांगणे, नियमित लसीकरण, गरोदर मातांना प्रसुतीपूर्वी व पश्चात सेवा यासाठी संगिता मोटे यांनी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांचे हे कार्य जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ ठरले आहे. याबद्दल त्यांचा जि.प.सीईओ अमोल येडगे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्ष जयश्री मस्के, जि.प.सदस्या रेखाताई क्षीरसागर आदि मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.