बीडमधील पूण्यनगरीचे वरिष्ठ पत्रकार भास्कर चोपडे गंभीर आजारी आहेत.त्यांच्यावर औरंगाबादेत उपचार सुरू आहेत.त्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.मराठी पत्रकार परिषदेने त्यासाठी आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला असून बीड येथील कार्यारंभ या दैनिकातील सर्व कर्मचार्यांनी भास्कर चोपडेंसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारी मदतीवर अवलंबून न राहता पत्रकार आता दुसर्या पत्रकारासाठी पुढे येत आहेत ही फारच मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे.कार्यारंभ या दैनिकाचे संपादक आणि त्यांच्या टीमला परिषदेच्यावतीने मनापासून धन्यवाद.
