Home » ब्रेकिंग न्यूज » चक्रीवादळाशी मराठी कुटुंबानं दिली आठ तास झुंज.

चक्रीवादळाशी मराठी कुटुंबानं दिली आठ तास झुंज.

डोमिनिका : कॅरेबियन बेटांवरील चक्रीवादळाशी मराठी कुटुंबानं दिली आठ तास झुंज.
कॅरेबियन बेटांवर नुकत्याच येऊन गेलेल्या मारिया या भीषण चक्रीवादळात इथलं जनजीवन संपूर्ण उद्ध्वस्त झालं.
कॅरेबियन बेटांवर नुकत्याच येऊन गेलेल्या मारिया या भीषण चक्रीवादळात इथलं जनजीवन संपूर्ण उद्ध्वस्त झालं. इथल्या वादळाचा तडाखा मराठमोळ्या श्रीनिवास काळे यांच्या कुटुंबालाही बसला.
श्रीनिवास काळे कुटुंबियांनी या पाचव्या प्रतीच्या जोरदार चक्रीवादाळाशी सलग आठ तास झुंज देत आपलं घर वाचवलं.
या आठ तासांत त्यांना आलेले अनुभव आणि त्यानंतर डोमिनिका देशाच्या झालेल्या अवस्थेचा याची देही, याची डोळा वृत्तान्त काळे यांनी आपल्या शब्दांत खास बीबीसी मराठीच्या व्यासपीठावर मांडला आहे.
एक महिन्यापूर्वीची ही घटना. परंतु जणू काही काल घडली आहे असंच वाटतं. आम्ही गेल्या काही वर्षांपासून वेस्ट इंडीज बेटावर राहत आहोत.
त्यामुळे चक्रीवादळांची आम्हाला कल्पना आहे. पण मारिया चक्रीवादळ इतर वादळांपेक्षा भीषण होतं याची कल्पना मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आली.
या थरार नाट्याची सुरुवात १८ सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास झाली. त्यावेळी वारं पूर्ण ताकदीनं वाहू लागलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.