Home » माझी वडवणी » अधिकाऱ्यांच्या खूर्चीला चप्पलचा हार.

अधिकाऱ्यांच्या खूर्चीला चप्पलचा हार.

वडवणीत कृषी अधिकाऱ्यांच्या खूर्चीला चप्पलचा हार.
शेतकऱ्यांची हेळसांड थांबवण्यासाठी शिवसेना  आक्रमक 
वडवणी:-प्रतिनिधी
            वडवणी तालुका क्षेञफक्षळाच्या दृष्टीने जरी लहान असला तरी बहुतांशी भाग बागायती क्षेञात मोडतो. माञ शासकीय आधीकार्याकडुन कसल्याच प्रकारचे मार्गदर्शन तर लाबंच राहीले शेतकर्यांनी विविध यौजनासाठी कृषी आधीकारी सहीलाही सापडत नसल्याने वडवणी तालूका शिवसेनेच्या वतीने त्याचा  खुर्चीला चप्पल चा हार घालण्यात आला.
                 नेहमीच शेतकर्यासाठी रसत्यावर उतरून शिवसेना कार्यरत असते. याचाच भाग म्हणून आनेक शेतकरी वर्गाकरुन तालुका कृषी आधीकारी सतत गैरहजर असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.कधीही यावे आणि कधीही जावे असा मनमानी कारभार चालू आहे. आपल्या जवळच्या राजकीय व्यक्तीचे काम करणे आणी सर्व सामान्य शेतकर्यांसाठी उंटावरुन शेळ्या राखने असा प्रकार करत आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून विविध योजनांचा निधी मिळु शकला नाही.यामध्ये ठिबक सिचंन, शेततळी, फळबाग लागवडीचे अनुदान मिळाले नाही. यामुळे शेतकरी दररोज कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत पण तेथील कर्मचारीही साहेब नाहीत उद्या या नंतर बघु आसे म्हनत उडवाउडवीची उत्तरे देत आहे.ही बाब शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे यांना समजात संपुर्ण तालुका शिवसेनेला घेत कृषी कार्यालय गाठले असता अनेक शेतकर्यांनी त्याच्या व्यथा मांडल्या आसता याची दखल घेत तालुका कृषी आधीकार्याचा खुर्चिला चप्पल चा हार घातला आणी जर उद्यापासून कृषी आधीकारी आले नाहीत तर शिवसेना त्याना चप्पल चा हार घालीन असा ईशारा तालुका प्रमुख विनायक मुळे यांनी दिला. यावेळी शहर प्रमुख नागेश डिगे,उपतालुका प्रमुख रामदास ढगे,युवराज शिंदे,वचिष्ट शेडंगे,भैय्या खोसे, महेश जाधव,आबासाहेब शेळके सह शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.