एसपी नंदकुमार ठाकूर ॲक्शन मोडवर;आक्षेपार्ह पोस्ट पन्नास जणांविरुद्ध कारवाई.
– डोंगरचा राजा/आँनलाईन
लोकसभा मतदानानंतर जिल्ह्यात जातीय वादाच्या मुद्द्यावरून समाजविघातक पोस्ट करणाऱ्या 50 जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे.यापुढे समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल आणि गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर बीड जिल्ह्यात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे दोन समाजात कटुता निर्माण झाल्यामुळे दोन ठिकाणी वादविवाद होऊन हाणामाऱ्या झाल्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. सदर बिघडलेल्या वातावरणामुळे सायबर पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 50 जणांना नोटीस बजावून कारवाई केल्याची माहिती सायबर सेल च्या पोलिसांनी दिली.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी .समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई करण्यात येईल आणि संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. समाज माध्यमांवर पोस्ट करणाऱ्या प्रत्येकाने खबरदारी घेऊन कोणाचीही भावना दुखावणार नाही. या बाबत काळजी घ्यावी असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.