कसं आहे,काय आहे कर्जत मध्ये आवर्जुन वाचा.?

0
124

कसं आहे,काय आहे कर्जत मध्ये आवर्जुन वाचा.?

सिद्धटेक:- अष्टविनायकांपैकी एक ठिकाण सिध्दीविनायक म्हणून प्रसिद्ध, भीमा नदीच्या तीरावर व नगर पुणे जिल्ह्याच्या सरहद्दी वरील ठिकाण,
नदीकाठी पालात मिळणारे पिठलं भाकरी ठेचा, कांदा भरीत असे भोजन खवय्याचे खास आकर्षण आहे. भीमा नदीत नौकानयनाची सोय पण येथे आहे.
———————-
कर्जत:-
सद्गुरु श्री गोदड महाराज मंदीर,
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून कर्जत वासीयांचे ग्रामदैवत आहे. कर्जत शहरात महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली असून येथे भव्य मंदिर आहे.
तर त्याच्या जन्मस्थळी ही भव्य मंदिर काही वर्षापूर्वी बांधले आहे, येथे तळघरात ध्यान मंदिर ही आहे.
आषाढ वद्य एकादशीला येथे मोठी यात्रा भरते तीन मजली रथ नगर प्रदक्षिणा करतो तो भविका मोठ्या दोरखंडा द्वारे ओढतात, त्याला नियंत्रण करण्याचे अत्यंत जोखमीचे काम उटी लावणारे करत असतात. हा उटी लावण्याचा मान येथील लोहार व सुतार समाजाकडे आहे. महाराजांच्या रथ पालखी या उत्सवात विविध जाती धर्माना वेगवेगळा विशेष मान आहे.

श्री मायमोर्ताब देवी (कापरेवाडी वेस):- कर्जत येथील मायमोर्ताब देवीला तुळजापूर येथे सीमोल्लंघन मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान आहे, सुमारे चारशे वर्षापासून ही परंपरा असून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करताना देवीच्या मूर्तीच्या अग्रभागी कर्जत येथील मायमोर्ताब देवीला मान कर्जत येथील क्षीरसागर घराण्याला असून नवरात्रीत पाचव्या माळेला देवीला घेऊन ते दरवर्षी तुळजापुरला जातात.

श्री मल्लिकार्जुन मंदिर (कापरेवाडी वेस):- कर्जत येथील शिव मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे पुरातन ऐतिहासिक, धार्मिक असून
मल्लिकार्जुन मंदिर बेसाल्ट खडकाने बनवलेले आहे. हे मंदिर १३ व्या -१४ व्या शतकातील आहे. या मंदिराच्या भोवती पुरातन अश्लील शिक्षण देणारी काही कोरीव शिल्प ही पाहायला मिळतात. शिव मंदिर (नकटिच देऊळ) मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरच आहे. यामध्ये शिवलिंगाचे मुख्य मंदिर आहे. या मंदिरात गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि मुखमंडप यांचा समावेश आहे. हे मंदिर पण १३ व्या -१४ व्या शतकातील आहे.

शिपी आमटी – कर्जत मधील अत्यंत प्रसिध्द पदार्थ आहे. येथे येणाऱ्या पाहुण्यांना हा पदार्थ विशेषतः पाहुणचार म्हणून केला जातो. अनेक हॉटेलमध्ये रुचकर शिपी आमटी, चपाती– भाकरी, खारे शेंगदाणे, पापड, कांदा, काकडी, टोमॅटो, तुप, अशा अनोख्या पण स्वादिष्ट चवीसह मिळते.
———————-
रेहेकुरी काळवीट अभयारण्य -हे अभयारण्य २९ फेब्रुवारी १९८० साली काळविटांच्या संरक्षणासाठी निर्माण झालेले हे राज्यातील पहिलेच अभयारण्य आहे. सर्वत्र काळविटांच्या शिकारीमुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना या अभयारण्यात त्यांची सहाशेच्या जवळपास संख्या आहे. त्याचबरोबर निम, सिसू, खैर, हिवर, बोर या झाडांच्या तर कुसाळी, डोंगरी मारवेल आणि पवन्या या गवतांच्या जाती येथे आढळतात. पूर्वी या ठिकाणी माळढोक पक्षांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती.
अभयारण्यात ठिकठिकाणी मनोरे उभारण्यात आले आहेत. त्यावरुन आपल्याला काळवीट व इतर प्राणी सहजपणे पाहता येतात. प्राण्यांमध्ये काळविट, हरीण, ससा, कोल्हा हे प्राणी या ठिकाणी आढळून येतात.
या अभयारण्यात वेगवेगळे लपनगृह उभारण्यात आले असून प्राणी पाणी प्यायला येतात तेव्हा त्यांना त्रास न होता, चाहूल न लागू देता आपण त्यांना जवळून पाहू शकतो.
———————-
मांदळी- श्री लालगीर बाबा समाधी मठ ट्रस्ट व ओम चैतन्य आत्मारामगिरी महाराज यांचे ३२ वर्षापासून वास्तव्य.
नगर सोलापुर महा मार्गावरील मांदळी गावात प्रवेश केल्यावर मोठी स्वागत कमान आहे. गावात मठ आहे. महान तपस्वी सद्गुरु लालगीर स्वामींनी संजीवन समाधी १३ व्या शतकात मांदळी या ठिकाणी घेतलेली आहे. संजीवन समाधीसमोर लालगीर बुवांच्या १८ शिष्यांच्या समाधीच ही आहेत. उजव्या बाजूला गणपती व मारुतीचे मंदीर आहेत. मंदिरातच श्री आत्मारामगीरी महाराज यांचे वास्तव्य असलेली खोली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी एकाच शारीरिक अवस्थेत खडतर तपश्चर्या करत आहेत. अधून मधून ते सीता स्वयंवर वर गीत म्हणताना त्याचा गोड आवाज ऐकणे भाग्याचे समजले जाते, ते स्वत: या स्वयंवर पाहत आसल्याचे आपल्याला वाटते.
———————-
क्षेत्र शेगुड – मल्हारी मार्तंड देऊळ जुने असून देशातील १२ मल्हार मंदिरांपैकी एक ठिकाण शेगुड येथे आहे, जेजुरी नंतर खंडोबाचे महत्वाचे हे क्षेत्र समजले जाते.
३५० वर्षांपूर्वीचे असलेले हे मंदिर २ ते ३ एकरामध्ये पसरलेले आहे. येथे टेहळणीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने जागा तयार केली आहे व वर जाता येईल अशी व्यवस्थाही केली आहे. तटबंदीच्या उत्तर बाजूस भव्य प्रवेशद्वार असून त्यावर तत्कालीन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो. एका शिलालेखावर लिखाण व नक्षीदार काम केलेले दिसते. सुंदर दगडी दिपमाळा, महाद्वाराच्या आत डाव्या बाजूला दगडी बारव खोदलेली असून आत उतरण्यासाठी पायऱ्या दिसतात.
दक्षिण महाद्वाराजवळ रथोत्सवात खंडेराया ज्या अश्वावर स्वार होतात तो घोडा व रथ आहे. मुख्य गाभाऱ्यात म्हणजेच सभामंडपातून आत गेल्यावर आपल्याला खंडेरायाची एक प्रसन्न व आकर्षक मूर्ती नजरेस पडते त्यासोबत डाव्या बाजूला म्हाळसा देवी तर उजव्या बाजूला बानू देवी यांच्या मुर्त्या दिसून येतात. या मंदिराचा कळस उंच असून त्यावर नवदुर्गा व नवनाथांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील जेजुरी, पाली, शेगुड, धावडी निमगांव, सातारे (औरंगाबाद), मोळेगांव (नांदेड), नळदुर्ग – आंदुर (उस्मानाबाद) व कर्नाटक येथील बिदर आदीमल्हार, देवरगुड्डा, मंगसुंदळी, मैलाळ, भैलारसिंग असे हे देशातील सर्व १२ मल्हार असून त्यातील एक म्हणजेच शेगुडचे खंडोबा मंदिर हे कर्जत तालुक्यात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेगुड हे शेवटचे गाव असून त्या पुढे सोलापूर जिल्हा सुरु होतो.
शेगुड गावामध्ये खंडेराया गादी व घोडा वापरतो म्हणून कोणीही ग्रामस्थ झोपायला गादी व कोणत्याच प्रसंगी घोडा वापरत नाही. तसेच देवाचे हे मंदिर दोन मजली आहे त्यामुळे बाकी गावात कोणीच दोन मजली घर बांघत नाही. मंदीराच्या प्रांगणात असलेले चिंचेचे झाड हे जवळपास १२५ वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते.
———————-

राशीन
श्री जगदंबा देवी मंदिर, -दक्षिण भारताच्या धार्मिक, राजकीय व सामाजिक इतिहासात राशीन या तीर्थक्षेत्राला फार मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. जगदंबेचे स्वयंभु स्थान‌ असलेल्या या तीर्थ क्षेत्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहासही बोलका आहे. अष्टभुजा देवीने महीषासुराशी नऊ दिवस लढाई करून त्याचा वध केला. या घ‌ट‌नेचा राशीन‌च्या स्व‌यंभु देव‌तांशी संबंध‌ जोड‌ला जातो. श्री क्षेत्र राशीन‌ हे श्री येमाई देवीचे स्व‌यंभु स्थान‌ आहे असे मान‌ले जाते. या देवीला कुणी रेणुका देवी म्ह‌ण‌तात‌, त‌र‌ कोणी येमाई देवी म्ह‌ण‌तात‌. स‌र‌कार‌ द‌प्त‌री मात्र श्री ज‌ग‌दंबा देवी असेच‌ स्थानाचे नांव‌ प्रच‌लित‌ आहे. प‌रंतु मंदिराच्या प‌श्चिमेक‌डील‌ भिंतीव‌र‌ जो शिलालेख‌ आहे, त्याव‌रील‌ नोंदीव‌रून‌ श्री येमाईदेवी हाच‌ उल्लेख‌ ब‌रोब‌र‌ अस‌ल्याचे मान‌ले जाते. देव‌ळात‌ ज्या पारंपारीक‌ आर‌त्या म्ह‌ट‌ल्या जातात‌ त्याम‌ध्येही श्री य‌माई देवी असाच‌ उल्लेख‌ आढ‌ळ‌तो. या नावाला प्रभु राम‌चंद्राच्या अख्याइकेचाही संद‌र्भ‌ आहे. सीतामाईला राव‌णाने प‌ळ‌वुन‌ नेले. सीतेला पाह‌ण्यासाठी प्रभु राम‌चंद्र वेडे पीसे झाले होते. त्यावेळी रामाची गंम‌त‌ क‌र‌ण्यासाठी पार्व‌ती देवीने सीतेचे रूप‌ धार‌ण‌ केले पार्व‌ती सीतामाईच्या रूपात‌ रामापुढे उभी राहीली, त्यावेळी प्रभु राम‌चंद्राने त्यांना येमाई अशी हाक‌ मार‌ली. त्याव‌रुन‌च‌ राशीन‌च्या देवीला येमाई असे म्ह‌ण‌तात‌. अशी एक‌ अख्याईका ऎकायला मिळते. या देवीचे मुळ‌ ठिकाण‌ मान‌ले जाते. देवीची मुर्ती च‌तुर्भुज‌ असुन‌ ती स्व‌यंभुच‌ उभी आहे.
असे मानले जाते. दोन्हीच्या म‌ध्य‌भागी श्री च‌तु:श्रुंगी देवीची तांब्याची च‌ल‌मुर्ती आहे. स्थानिक‌ लोकांक‌डुन‌ जी माहीती मिळते,त्यानुसार‌ राशीन‌ येथील‌ देवीचे स्थान‌ १३०० व‌र्षापुर्वीचे आहे. असे मान‌ले जाते. राशीन‌ गांवाचे र‌च‌नेच्या द्रुष्टीने दोन‌ भाग‌ प‌ड‌तात‌. प‌हीला भाग‌ प‌श्चिम‌क‌डील‌ आणि दुसरा भाग‌ पुर्वेक‌डील‌. प‌श्चिमेक‌डील‌ भागात‌ जुन्या ग‌ढ्यांची व‌बुरूजांची अव‌शेष‌ आढ‌ळ‌तात‌. निजाम‌शाही मोग‌ल‌शाही व‌ पेश‌वाई या काल‌खंडात‌ राशीनचे अस्तित्व‌ वेग‌वेग‌ळ्या घ‌ट‌नांव‌रून‌ दिसुन‌ येते. इ.स.७०० म‌ध्ये विन‌यादित्य‌ चालुक्याने कोर‌लेला ताम्रप‌ट‌ व‌ इ.स‌.८०७ म‌ध्ये राष्ट्रकुट‌ गोविंद‌ तिस‌रा यांनी घ‌ड‌विला. ताम्रपाट‌ याम‌ध्ये राशीनचा “भुक्ती” असा उल्लेख‌ केलेला आहे. राशीन‌च्या या इतिहासाचे सर्वात‌ जुने पुरावे मान‌ले जातात‌. सात‌व्या श‌त‌कात‌ राशीन‌ला द‌क्षिण‌ भार‌ताच्या इतिहासात‌ स्थान‌ होते.त‌त्पुर्वीच‌ हे गांव‌ व‌स‌लेले असावे. ब‌दामी चालुक्याच्या कालाव‌धी नंत‌र‌ मात्र राशीन‌चे फार‌से उल्लेख‌ साप‌ड‌त‌ नाहीत‌. याद‌वांच्या अस्ताप‌र्यंत‌ मानाचे स्थान‌ असावे असे म‌.ना.रेणुक‌र‌ या अभ्यास‌काने म्ह‌ट‌ले आहे.म‌ध‌ल्या निजाम‌शाहीत‌ राशीनचे उल्लेख‌ अद्याप‌ मोठे साप‌ड‌त‌ नाहीत‌. निजाम‌शाहीच्या अस्तानंत‌र‌ मात्र द‌क्षिणेत‌ मोग‌लांचा पुर्ण‌ अंम‌ल‌ होता. त्याकाळात‌ राशीन‌चे म‌ह‌त्व‌ वाढ‌ल्याचे आढ‌ळते या गांवाची पाटील‌की भोस‌ले घ‌राण्याक‌डे आहे. छ‌त्रप‌ती शिवाजी म‌हाराजांचे चुल‌त‌ बंधु श‌रीफ‌जी भोस‌ले यांचे ते वंश‌ज‌ आहे. श‌रीफ‌जी आणि त्यांचा मुल‌गा त्रिंब‌क‌जी हे औरंग‌जेबाच्या नोक‌रीत‌ होते. औरंग‌जेब‌ने त्यांची र‌वान‌गी भिव‌र‌ थ‌डीव‌र‌ केली तेव्हापासुन‌ हे घ‌राणे येथे स्थायिक‌ झाले. देव‌ळाच्या उत्तरेक‌डील‌ श‌रीफ‌जी, त्र्यंब‌क‌जी व‌ त्यांच्या प‌त्नीची स‌माधी आहे. त्याव‌रून‌ ही राशीनची ऎतिहासिक‌ व‌ त्याकाळ‌चे राज‌कीय‌ म‌ह‌त्व‌ ल‌क्षात‌ येते. राशीन‌ ज‌व‌ळ‌ औरंग‌पुर‌ नावाची पेठ‌ व‌स‌विण्याचा हुकुम‌ औरंग‌जेबाने दिला होता. ती पेठ‌ आज‌ मंग‌ळ‌वार‌ पेठ‌ म्ह‌णुन‌ ओळ‌खली जाते. देवीच्या मंदिराभोव‌ताल‌चा जुन्या औरंग‌पुर‌ म‌ध्ये स‌मावेश‌ होत‌ होता. फितुर‌ क‌वी जंग‌ यांचे राशीन‌ हे जहागिरीचे गांव‌ होते. त्यानंत‌र‌ राशीन‌स‌ह‌ आस‌पास‌चा प‌रीस‌र‌ मराठ्यांच्या ताब्यात‌ गेला. पेश‌वाईतील‌ मुत्स्स्‌द्दी अंताजी माण‌केश्व‌र‌ यांची राशीन‌ची देवी ही कुल‌स्वामींनी होती देवीच्या क्रुपेने अंताजींना वैभ‌व‌ व‌ किर्ती लाभ‌ली. त्याब‌द्दल‌ क्रुत‌ज्ञ‌ता व्य‌क्त‌ क‌र‌ण्यासाठी त्यांनी मंदिराच्या प‌श्चिमेला ओव‌र‌या बांध‌ल्या. याव‌रील‌ मराठी व‌ एक‌ संस्कृत‌ असे दोन‌ शिलालेख‌ आहेत. त्याव‌र अंताजी माण‌केश्व‌र‌ यांचे नांव‌ आहे. देवीच्या पुजेसाठी श्रीमंत‌ पेश‌व्यांनी ज‌मिनी इनाम‌ दिल्या. हे त्यावेळ‌च्या आक‌डे वारीव‌रून‌ दिस‌ते. त्याकाळातील‌ ज‌मिनीचा उतारा थोडासा जीर्ण‌ झालेल्या अव‌स्थेत‌ साप‌ड‌ला आहे. अशी माहीती म‌.ना.रेणुक‌र‌ यांनी जाहीर‌ केली आहे. इतिहास‌कार‌ द‌त्तो वाम‌न‌ पोत‌दार‌ यांनी मंदिराच्या उत्प‌त्ती बाब‌त‌ लिहुन‌ ठेव‌ले आहे. युध्दाम‌ध्ये दैतांना य‌म‌लोकाला पाठ‌विणारी देव‌ता म्हण‌जे येमाईदेवता आणि ज्या गांवी दैत्यांचा म्रुत‌देहाचा राशी प‌ड‌ल्या ते राशीन‌ गांव‌. असे पोत‌दार‌ यांनी म्ह‌ट‌ले आहे. मंदिराचे बांध‌काम‌ व‌ शिल्प‌ पाषाणात‌ आहे. तेथे लाक‌डाचा माग‌मुस‌ही साप‌ड‌त‌ नाही. देव‌ता स्व‌यंभु अस‌ल्याने ती तांद‌ळाच्या स्व‌रूपात‌ आहे. तेथे न‌व‌रात्र अष्ट‌मीच्या दिव‌शी मुख्य‌ यात्रा भ‌र‌ते त्यावेळी देवीचे भळांदे निघ‌ते. एका मातीच्या क‌ल‌शात‌ ओटीचे सामान‌ म्ह‌ण‌जे ख‌ण‌ नार‌ळ‌, बांग‌ड्या, ह‌ळ‌द‌ कुंकु इ. साहीत्य‌ घालुन‌ स‌र‌की प‌स‌र‌ली जाते. नंत‌र‌ ते पेट‌विले जाते त्यालाच‌ भ‌ळांदे हे नाव‌ आहे. राशीन‌चे आण‌खी वैशिष्ट्ये म्ह‌ण‌जे इस्लाम‌ ध‌र्मियांची साठ‌ घरे आहेत‌. हे लोक‌ही घ‌‌टस्थाप‌ना क‌र‌तात‌ व‌ रेणुका मातेला भ‌ज‌तात‌. यात्रेचे कामात‌ उत्साहात‌ भाग‌ घेतात‌. अशी माहीती द‌त्तो वाम‌न‌ पोत‌दार‌ यांनी लिहुन‌ ठेव‌ली आहे.
देवस्थानाच्या वेब साईटला भेट द्या http://shreejagdamba.in/

श्री विष्णू मंदिर, राशीन – गावाच्या वेशीच्या जवळ असलेले व भारतातील श्री विष्णूंच्या दुर्मिळ मंदिरांपैकी एक असलेले विष्णू मंदिर. प्रांगणामध्ये भव्य आकर्षक अशा भगवान विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाची मूर्ती पाहायला मिळते. आत सभामंडपात प्रवेश करताच आपल्याला सुंदर असे दगडी खांब नजरेस पडतात. लगतच विठ्ठल रुखुमाई आणि गणपतीची मूर्ती नजरेस पडते. या मंदीराच्या सभोवताली दगडी तटबंदी असून मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत.

काशी विश्वेश्वर मंदिर, राशीन –
पेशवेकालीन मंदिर: श्री विष्णू मंदीराच्या समोरच्या प्रांगणात आपल्याला मोठा बारव बांधलेला दिसून येतो. त्याच्या बाजूला तटबंदी व त्या आत काशी विश्वेश्वराचे मंदिर दिसते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील मोठी पितळी घंटा. अभ्यासक असे सांगतात की अशी घंटा भारतामध्ये फार कमी ठिकाणी सापडते जिचा आवाज कित्येक किलोमीटर पर्यंत ऐकायला येतो. गाभाऱ्यात महादेवाची पिंड नजरेस पडते. या गाभाऱ्यात येण्यासाठी दोन द्वार आहेत. या मंदिराचे निर्माणही अकोबा शेटे यांनीच केले असून मंदिराच्या ठिकाणी त्यांची बैठक व्यवस्था व सिंहासन पहायला मिळते. तिथेच एक भुयारी मार्ग आपल्या नजरेस पडतो. येथील हे भुयार थेट जगदंबा माता मंदीरात निघते असेही सांगण्यात येते.

राशीनची वेगळी वैशिष्ट्ये:- गावात
छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा.
राशीन येथील बाजारात मिळत असलेले पालावरचे रुचकर मटन विशेष प्रसिद्ध आहे. पाण्यातील ताजे मासे प्रसिद्ध आहे.
येथे मंगळवारी मोठा भरणारा बैल बाजार भरतो. बैल सजावटीचे सामान मिळते. संपूर्ण राशीनला तटबंदी असून या गावामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत.
———————-
बेनवडी –
हरिनारायन स्वामी मंदिर – अत्यंत सुंदर कोरीव काम असलेले पुरातन मंदिर,
———————-
दुरगाव-दुर्योधनाचे मंदिर,
देशातील एकमेव असे दुर्योधनाचे मंदिर दुरगाव येथे आहे.
पौराणिक काळातील कौरव – पांडवांच्या युद्धाची या गावास पार्श्वभूमी आहे. पांडव अज्ञातवासात होते. ते अज्ञातवासात असताना काही काळ दुरगाव येथे होते असे सांगण्यात येते. पांडवांना कौरवांनी अज्ञातवासात पाठवल्यानंतर ते वनवास भोगत असताना या ठिकाणी आले अशी आख्यायिका सांगण्यात येते. दुरगावात असलेला पांडव डोह अजून याची साक्ष देतो. लोक दुर्योधानाबरोबर पांडव डोहाची पूजा करतात. पावसाळ्यात मंदिरातील दुर्योधनाची मूर्ती कोंडल्यावर मूर्तीला घाम फुटतो व पाऊस पडतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
———————-
चोंडी – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ, त्याची शिल्पसृष्टी एकदा पाहण्यासारखी, येथे सत्तावीस नक्षत्र त्याचे गार्डन बनवलेले असून प्रत्येक नक्षत्राची स्वतंत्र मूर्ती पहायला मिळते त्या नक्षत्राची झाडे येथे लावलेली आहेत. भव्य महादेव मंदिर आहे. चोंडी जामखेड तालुक्यात असले तरी कर्जत तालुक्याच्या सीमेवर सिना नदी काठी आहे.
———————-
प्रत्येक प्रादेशीक भागाचा आपला स्वतंत्र असा एक ईतिहास असतो, परंपरा असतात, जीवनशैली असते आणि हे वेगळेपण तिथले नागरीक वर्षानुवर्षे ते जपुन शाश्वतपणे एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे हे सग़़ळं हस्तांतरित करत असतात.
पण हे सगळ जपत असतांना या परंपरा, ऐतिहासिक , धार्मिक वास्तु, उस्तव, संस्कृती यांच कुठेतरी एकत्रीत संकलन होऊन जगासमोर हा सुवर्ण ठेवा यायला हवा.आणि म्हणूनच कर्जत जामखेड मधील हा अमुल्य ठेवा केवळ त्या भागापुरता मर्यादित न राहता सर्वांसमोर यावा यासाठी मा. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन
https://karjatjamkhed.com/mr/ हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. ज्यामध्ये कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे,धार्मिक स्थळे,प्रेक्षणीय स्थळे,ईथले वेगळे वैशिष्ट्ये,ईथली खाद्यसंस्कृती,लोककला या सर्वांची माहीती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा ही आपण सर्व जण वापर करू शकता.
———————-
कर्जत मधून काय पाहायचे, कसे, कोठे, जायचे याबाबत आपला ट्रॅव्हल प्लॅन बनवण्यासाठी संकलन करणारे पत्रकार आशिष बोरा मो ९४२३७८८३७० यांचे बरोबर संपर्क साधू शकता.
या सर्व ठिकाणाबाबत आपण गुगल मॅप वर गुगल वर माहिती घेऊ शकता
———————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here