मराठी पत्रकार परिषदेने आतापर्यंत केला ४८ तालुका पत्रकार संघांचा आणि ६ जिल्हा संघांचा सन्मान…

0
110

मराठी पत्रकार परिषदेने आतापर्यंत केला ४८ तालुका पत्रकार संघांचा आणि ६ जिल्हा संघांचा सन्मान…

– डोंगरचा राजा / आँनलाईन

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या धयेयधोरणानुसार सर्वोत्कृष्ट कार्य करणारया राज्यातील ४८ तालुका पत्रकार संघांना परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे..६ जिल्हा संघांना देखील सन्मानीत करण्यात आले आहे..

राज्यातील अनेक तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पत्रकार संघटन मजबुत करण्याबरोबरच पत्रकारांचे हक्क आणि माध्यम स्वातंत्र्यासाठी काम करीत असतात.. त्याचबरोबर सामाजिक बांधीलकी जपत विविध सामाजिक उपक्रम देखील राबवित असतात.. त्यांच्या या कार्याचं राज्यस्तरावर कौतूक व्हावं, राज्य पातळीवर त्याच्या कामाची दखल घेतली जावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सहा वर्षांपासून परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. वसंतराव काणे यांच्या नावाने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि स्व. रंगाआण्णा वैध यांच्या नावे आदर्श जिल्हा संघ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते .. हे सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागात घेतले जातात..नागपूर येथे पहिला कार्यक्रम श्री. नितीन गडकरी आणि श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला..त्यानंतर पाटण,(जिल्हा सातारा) अक्कलकोट,(जिल्हा सोलापूर) वडवणी,(जिल्हा बीड) बोर्डी (जिल्हा पालघर, गंगाखेड (जिल्हा परभणी) आदि ठिकाणी हे सोहळे संपन्न झाले.. यावर्षीचे हे सातवे वर्ष असून कर्जत (जिल्हा अहमदनगर) येथे खा. संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होत आहे.. रोहीत पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत.. पुरस्कार वितरण सोहळयाबरोबरच दरवर्षी तालुका अध्यक्षांचा मेळावा देखील घेतला जातो..500 ते 600 पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित असतात..
राज्यात काही जिल्हा संघांची कामं देखील उल्लेखनीय आहेत अशा जिल्हा संघांचा देखील सन्मान केला जातो.. आतापर्यंत नाशिक, भंडारा, पुणे, सिंधुदुर्ग, नांदेड, बीड जिल्हा संघांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.. यंदा रत्नागिरी जिल्ह्याचा सन्मान केला जात आहे..
कर्जत येथे ७ एप्रिल २०२३ रोजी होत असलेल्या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेने केले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here