माणसिक जाचास कंटाळून किराणा चालकाची गळफास घेऊन आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल.
– सिरसाळा/अतुल बडे
सिरसाळा – किराणा सामान उधार दिला नाही म्हणून सतत माणसिक त्रास दिल्याने एका किराणा दुकान चालकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारुर तालुक्यातील कान्नापूर ( मोहा) येथे घडली आहे.
अविनाश आशोक देशमुख वय ३२ वर्षे रा.कान्नापूर (ता धारुर ) असे मयत व्यक्तीचे नाव व पत्ता आहे. या विषयी सिरसाळा पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मयत अविनाश देशमुख यांचे कान्नापूर येथे किराणा दुकान आहे. गावातीलच स्वप्नील रामकिशन देशमुख, सुरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांना अविनाश ने किराणा सामान उधार दिले नाही. याचा राग मनात धरून यातील आरोपी किराणा चालक अविनाश देशमुख यास सतत माणसिक त्रास देत असत ह्या माणसिक त्रासास कंटाळून दिनांक २३ रोजी वार गुरुवार रात्री ८ वाजताच्या दरम्यान स्वताच्या शेतात अविनाश देशमुख याने गळफास घेऊन आत्महत्य केली.माणसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोपी स्वप्नील रामकिशन देशमुख, सूरज रामकिशन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांच्यावर सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये मयताचे भाऊ संतोष देशमुख यांच्या फिर्यादीवरून कलम ३०६,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मयताचे शवविच्छेदन सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आले,दुपारी कान्नापूर येथे मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गित्ते करत आहेत.