Home » वाटचाल….. आपल्या पाठबळावर.!

वाटचाल….. आपल्या पाठबळावर.!

आपल्या सर्वांच्या साथीने अन सरकार्याने तीन वर्षा पुर्वी “डोंगरचा राजा” चा पहीला अंक प्रकाशित केला .पत्रकारितेत गत अठरा वर्षापासुन कार्यरत असतांना सामाजिक जाणिवेतुन काम करत आलो.गोरगरीब, वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. या प्रवासात सर्वसामान्यांचा आवाज होईल असे वृत्तपत्र असावे अशी भावना निर्माण झाली. यातुनच “डोंगरचा राजा”आपल्या पर्यत येऊ शकला.गत तीन वर्षाच्या काळात अनेकांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आम्ही यशस्वी वाटचाल केली आहे.आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे.तशी ती वृत्तपत्र क्षेत्रातही आहे.मोठमोठे ग्रुप आपली वृत्तपत्रे “लाँच” करत असतांना जिल्हास्तरीय दैनिके , साप्ताहिके यांचा अर्थिक ताळमेळ अवघड होत चालले आहे.अशा मंंदीच्या काळात आम्ही “डोंगरचा राजा” ची वाटचाल सुरू केली .साप्ताहिकाचा पहिला अंक काढताना झालेली ओढाताण आणि धावपळ मला आजही आठवते पहिल्याच अंकाला झालेली धावपळ पाहुन पेपर काढणे सोपे पण चालवणे अवघड हे आजवर ऐकलेले वाक्य खरेच आहे हे पटले.पण अंकात खंड पडू द्यायचा नाही हा निश्चय मनोमन पक्का केला होता .वडवणी आणि परिसरातील जुन्या मित्रांनी याकामी मोठी साथ दिली.माजलगांव मतदारसंघाला एक हक्काचा आवाज “डोंगरचा राजा” च्या माध्यमातून मिळाला.पहिल्या दोन महिन्यातच “डोंगरचा राजा” सर्वांना आपला वाटु लागला .अगदी मंगळवारीच अनेकांकडुन मग काय विशेष “डोंगरचा राजा” ला अशी विचारणा होऊ लागली.बुधवारी तर “डोंगरचा राजा” वाचणा-यांचे फोन ही येऊ लागले. चांगल्या वाईट प्रतिक्रिया ऐकायला मिळु लागल्या. वडवणी ,
धारुर,माजलगांव .केज,परळी आदी भागातील समस्या आम्ही प्रमाणिकपणे मांडल्या ,त्यांचा पाठपुरावाही केला.या काळात अडचणी आल्या आणि वाचक -जाहिरातदारांच्या खंबीर पाठींंब्यावर त्या पारही पाडल्या.आजपासुन माहिती तंत्रज्ञानाच्या जगतात प्रवेश करत वेबसाईडव्दारे जगभरात “डोंगरचा राजा” वाचता येणार आहे.हा प्रवास आपल्या पाठिंब्यावरच दमदारपणे सुरू आहे.यात प्रोत्साहन अन मार्गदर्शन आमच्या साठी नक्कीच मोलाचे आहे.
            रोखण्यास वाट माझी ,
            वादळे होती आतुर…
          डोळ्यांत जरी गेली धुळ,
            थांबण्यास उसंत नाही…
         येतील वादळे ,खेटेल तुफान ,
              तरी वाट चालतो…
       अडथळ्यांना भिवुन अडखळणे
              पावलांना पसंत नाही.
            
       संपादक —  अनिल वाघमारे 

Attempt essay writer to keep a topic so that you get a shared thought when it has to do with your essay.